भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा माेहाेर्ली येथे फुलाेरा क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत बालभवनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख पुरुषाेत्तम पंचफुलीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर चेलीरवार होते. उपाध्यक्ष साधनव्यक्ती रवींद्र खेवले, प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सदानंद जवादे, ताराचंद साखरे, मुनेश्वर राऊत, सोनी कुळमेथे, माधुरी मांडवकर, अंगणवाडी सेविका ज्योती बेजंकीवार, कमल पगडपल्लीवार, मुख्याध्यापक मारोती आरेवार, शिक्षिका दुर्गा सिडाम उपस्थित होते. बालभवनात विविध साहित्याची भर घालण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या अध्यापनातून विद्यार्थांच्या ज्ञानात भर घातली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी बालभवन उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन भेंडाळाचे केंद्रप्रमुख पुरुषोत्तम पंचफुलीवार यांनी केले. संचालन शिक्षक मिलिंद घायवट यांनी केले.
माेहाेर्ली येथे बालभवनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST