शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली शहरात नवमतदारांसह महिलांमध्ये प्रचंड उत्साह केंद्रांवर भरदुपारी रांगा : सावलीसाठी मंडप अन् थंड पाण्याची व्यवस्था

By दिलीप दहेलकर | Updated: April 19, 2024 14:46 IST

Lok Sabha Election 2024: कडक उन्हाची पर्वा न करता नवमतदारांसह, महिला, वृद्ध असो वा अपंग गडचिराेली शहरातील मतदारांमध्ये अनेक केंद्रावर उत्साह दिसून आला.

गडचिराेली : कडक उन्हाची पर्वा न करता यंदाच्या लाेकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी नवमतदारांसह महिला मतदारांमध्ये गडचिराेली शहरातील अनेक केंद्रावर उत्साह दिसून आला. शहराच्या महात्मा गांधी नगरपरीषद शाळेच्या केद्रावर भर दुपारी १ . १५ वाजता मतदारांची माेठी रांग दिसून आली. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून गडचिराेलीजिल्हयात दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान आहे. त्यामुळे येथील बहुतांश केंद्रांवर सकाळपासून तर दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकत इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. युवकांनी दिव्यांग व अपंगांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व्हिलचेअरचा आधार दिला. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर पोलिस, होमगार्ड, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी कर्तव्यावर होते. केंद्रावर कॅनव्दारे थंड पाण्याची सुविधा पुरविण्यात आली. प्रशासनाने ठिकठिकाणी सेल्फ़ी पॉईंट उभारून मतदारांना केंद्रावर येण्यासाठी प्राेत्साहीत केले. मतदारांना घरोघरी चिठ्ठ्यांचे वितरण झाल्यानंतरही अनेक राजकीय पक्षांच्या बुथवर जावून मतदारांनी आपली चिठ्ठी घेण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी दीड वाजतापर्यंत शहरात व परीसरात मतदान शांततेत सुरू हाेते.

पती एका तर पत्नी दुसऱ्या केंद्रावरनिवडणूक विभागाने मतदार याद्या अपडेट केल्या तरी अनेकांच्या नावात छाेटया माेठया चुका दिसून आल्या. एकाच घरात राहून पती एका केंद्रावर तर पत्नीने दुसऱ्या केंद्रावर जावून आज मतदान केले. गडचिराेली शहराच्या गाेकुलनगरातील अनेक मतदारांच्या बाबतीत असा अनुभव या निवडणुकीत आला. पतीला चामाेर्शी मार्गावरील जि. प. शाळेच्या तर पत्नीला शासकीय विज्ञान काॅलेजच्या बुथावर मतदानासाठी जावे लागले. सदर प्रकार प्रत्यक्ष मतदारांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना सांगितला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४GadchiroliगडचिरोलीPoliticsराजकारण