शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात जमीन मोजणी पुन्हा बारगळली; पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

By संजय तिपाले | Updated: February 27, 2024 19:35 IST

मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

गडचिरोली: मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मुधोलीचक क्र. १ या गावात २७ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सलग दुसऱ्यांदा जमीन संपादनासाठी मोजणी प्रक्रिया होऊ शकली नाही.

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, मुधोली चक क्र.१, सोमनपल्ली, जयरामपूर, मुधोलीचक क्र.२, पारडी देव या परिसरातील ९६३.०५२२ हेक्टर जमीन शासनाने लोहप्रकल्पासाठी प्रस्तावित केली आहे. त्याकरिता महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाने काही महिन्यांपूर्वी संबंधित जमीन मालकांना भूसंपादन संदर्भातील नोटीस पाठवली होती. परंतु जमीन देण्यास येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांनी दोनवेळा या भूसंपादनाविरोधात मोर्चा काढला होता. तेव्हापासून यापरिसरात प्रशासन विरूद्ध गावकरी अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

अशात मंगळवारी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी जमीन मोजणीसाठी मुधोलीचक क्र.१ या गावात गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. गावकऱ्यांचा विरोध बघता परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परंतु गावकऱ्यांच्या विरोधापुढे टिकाव न लागल्याने कर्मचाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले. उद्योगांना जमीन देण्यावरून गावकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र असून बहुतांश शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे. तर काहींना जमिनीचा मोबदला वाढवून हवा आहे. यापूर्वीही इतर गावात असाच प्रकार घडल्याने प्रशासनापुढे भूसंपादनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. शासन आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीस आधीच पाठविली आहे. त्यानुसार आम्ही जमीन मोजणीसाठी गेलो असताना गावकऱ्यांनी विरोध केला. म्हणून मोजणी न करताच आम्हाला परतावे लागले. - उत्तम तोडसाम, उपविभागीय अधिकारी चामोर्शी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली