गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या मैदानावर ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दुर्गम भागातील तालुक्यांनी वर्चस्व प्राप्त करीत सर्वाधिक चषकांची लूट केली. रिले मुलांच्या गटात पंचायत समिती आरमोरीने विजेते तर मुलचेराने उपविजेते पद पटकाविले आहे. रिले मुलींच्या गटात पंचायत समिती मुलचेराने विजेते तर चामोर्शीने उपविजेते पद पटकाविले आहे. कबड्डीमध्ये मुलांच्या प्राथमिक गटात मुलचेराने विजेता तर भामरागडने उपविजेते पद पटकाविले. मुलींच्या कबड्डीमध्ये चामोर्शी विजेता तर एटापल्ली उपविजेता ठरली आहे. खो-खो मुलांमध्ये धानोरा विजेता तर मुलचेरा उपविजेता ठरला आहे. खो-खो मुलींच्या गटात धानोरा विजेता तर कुरखेडा उपविजेता ठरला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चामोर्शीने विजेते पद प्राप्त केले. माध्यमिक गटातून मुलींच्या खो-खो खेळात भामरागडने विजेते पद, सिरोंचाने उपविजेते पद, व्हॉलिबॉल मुलेमध्ये अहेरीने विजेता तर चामोर्शी उपविजेता ठरली आहे. व्हॉलिबाल मुलींच्या गटात धानोराने विजेता तर चामोर्शी उपविजेता, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चामोर्शी विजेता, धानोरा उपविजेता ठरला आहे. प्रश्नमंजुषा गटात कुरखेडा विजेता, धानोरा उपविजेता, कबड्डी मुलांच्या गटात कोरची विजेता, भामरागड उपविजेता, कबड्डी मुलींच्या गटात सिरोंचा विजेता, धानोरा उपविजेता, खो-खो मुलांमध्ये धानोरा विजेता, सिरोंचा उपविजेता ठरला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सामन्यांमध्ये कबड्डी महिला गटात गडचिरोली विजेता, अहेरी उपविजेता, खो-खो पुरूष गटात चामोर्शी विजेता, धानोरा उपविजेता, खो-खो महिला गटात चामोर्शी विजेता, एटापल्ली उपविजेता, व्हॉलिबॉल महिलांमध्ये एटापल्ली विजेता, चामोर्शी उपविजेता, क्रिकेट पुरूष गटात एटापल्ली विजेता, चामोर्शी उपविजेता, सांस्कृतिक कार्यक्रमात अहेरी विजेता, कुरखेडा उपविजेता ठरला आहे.
क्रीडा स्पर्धेवर दुर्गम तालुक्यांचे वर्चस्व
By admin | Updated: February 16, 2015 01:25 IST