शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीमध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर आता असणार भरारी पथकाची नजर

By संजय तिपाले | Updated: June 16, 2024 15:45 IST

१७ जूनपासून हे पथक रेती, मुरूम तस्करीवर 'वॉच' ठेवणार आहे.

संजय तिपाले, गडचिरोली: जिल्ह्यातील नदीपात्रातून व इतर ठिकाणाहून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता व   महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय भरारी पथक गठित केले आहे. १७ जूनपासून हे पथक रेती, मुरूम तस्करीवर वॉच ठेवणार आहे.

 भरारी पथकात तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे. या  भरारी पथकाला अवैध गौण खनिज उत्खनन बाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करणे, संबंधीत ठिकाणी भेट देवून मौका पंचनामा, जप्तीनामा करणे,  उपस्थितांचे जवाब घेणे व उत्खनन झालेल्या ठिकाणाची संबंधीत तालुक्याचे तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या उपस्थितीमध्ये मोजणी करुन पंचनामे तयार करणे,  कारवाईच्या वेळेस आवश्यकता वाटल्यास पोलीस संरक्षण घेणे, केलेल्या कार्यावाहीच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल अभिप्रायासह व अभिलेख जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करणे, प्राप्त तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विहित नोंदवहीत नोंदी ठेवणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण कार्यवाही दरम्यान गोपनियता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.----रेल्वेसाठी उत्खनन करणाऱ्या कंपनीला अभय?दरम्यान,  वडसा - गडचिरोली या ५२ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या कामासाठी कंत्राटदार कंपनीने मोठ्या प्रमाणात बेकायदेशररीत्या मुरूम उत्खनन केले आहे. एकीकडे बैलबंडीतून मुरूम, वाळू नेणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना कारवाईचा दंडुका दाखविण्यात मर्दुमकी दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून गडचिरोली शहराजवळ मुरुमाची लूट सुरू असताना प्रशासन डोळे मिटून का बसले?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कंपनीचे प्रशासनात पाठीराखे कोण, याची सध्या चर्चा आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली