उपअधीक्षक भूमिअभिलेख : अधिकार्याचे निलंबन करण्याची मागणी देसाईगंज: येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी यांनी नझूल खसरा २२ मधील प्लॉट क्र ६ ,५९ व ६0 चा फेरफार ५९२ नुसार २२ फेब्रुवारी २0१४ ला फेरफार घेतला आहे. संबंधीत जागेची लिज १९७४ संपलेली आहे. तेव्हापासून त्या जागेच्या लिजचे नूतनीकरण झालेले नाही. सदर फेरफार पुनर्विलोकनाचे आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकार्यांनी देऊनही अधिकारी सबंधीत अधिकारी फेरफार करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सतपालसिंग मक्कम यांनी केली आहे. स्थानिक तंबाखू लाईन मधील नझूल खसरा क्र. २२ मध्ये प्लॉट क्र. ६,५९ व ६0 मध्ये तक्रारकर्त्याचे आजोबा करतारसिंग पंजाबी व मेहताबसिंग सलुजा हे एकत्र राहत होते. त्यामुळे संबंधित जागेची लिज १९६८ साली मेहताबसिंग याच्या नावाने मंजूर झाली. मात्र तरीही सुरूवातीपासूनची प्लॉट क्र ६ मध्ये १00३ चौ.मीटर, प्लॉट क्र. ५९ मध्ये २३२0३ चौ.मीटर व प्लॉट क्र. ६0 आराजी ३३७५ चौ.मीटर जागेवर तक्रार कर्त्याच्या आजोबाची वहीवाट होती. संबंधित जागेच्या लिजचे नूतनीकरणाची मुदत सन १९७४ ला संपलेली आहे व सन १९७६ ला ज्याच्या नावाने लिज मंजूर झाली होती ते मयत झाले., अशा परीस्थितीत मयत मेहतांबसिंग सलूजा यांच्या नातवाने बनावटी ईच्छापत्र सादर करून भुमी अभिलेख अधिकार्यांशी संगनमत केले. सबंधित देसाईग्ांज उपधिक्षक भुमी अधिलेख अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची मौका चौकशी न करता सादर केलेल्या ईच्छापत्रानुसार २८ मार्च २0१४ ला फेरफार नोंद क्र. ५९२ नुसार फेरफार घेतला आहे. ४0 वर्षानंतर लिजच्या नुतनीकरणासाठी जिल्हाधिकार्यांची परवानगी आवश्यक आहे. वारंवार तक्रार केल्या नंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी देसाईगंज यानी फेरफार नोंद ५९२ हा सदोष असल्याचे मान्य देखील केले आहे. त्यामुळे संबंधित जागेचा फेरफार रद्द करून पुनलरेकन करण्याचा आदेश जिल्हा अधिक्षक भुमी अधिलेख कार्यालयाने २२ एप्रिल २0१४ ला दिलेला आहे. फेरफार पुनर्विलोकन करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सतपालसिंग पंजाबी यांनी केला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक गजभिये यांच्याशी संपर्क केला असता ते संपर्क क्षेत्राबाहेर होते.
नझूल खसर्याचे अवैध फेरफार
By admin | Updated: June 4, 2014 23:44 IST