लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : कोरोना संचारबंदीचा फायदा घेत काही लोकांनी गावाच्या परिसरातील मुरूमाचे अवैधरित्या खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे सदर प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी श्रीकांत सुगरवार यांनी केली आहे.अंकिसा परिसरातील चेतालपल्ली परिसरात मुरूमाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचा आरोप श्रीकांत सुगरवार यांनी केला आहे. १० मे रोजी सकाळी ८ वाजता अंकिसा येथे ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे सुगरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलसमोरील धान खरेदी केंद्राच्या परिरात हा मुरूम टाकला जात आहे. चेतालपल्ली येथील जि.प.शाळेमागील परिसरातूनही मुरूमाची अवैधरित्या खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
चेतालपल्लीत मुरूमाचे अवैध खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
अंकिसा परिसरातील चेतालपल्ली परिसरात मुरूमाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचा आरोप श्रीकांत सुगरवार यांनी केला आहे. १० मे रोजी सकाळी ८ वाजता अंकिसा येथे ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे सुगरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चेतालपल्लीत मुरूमाचे अवैध खनन
ठळक मुद्देमहसूल बुडाला : कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी