शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

राजोली नदी पात्रातून ३७१ ब्रास रेतीची अवैध उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५  हेक्टर आर जागेतील रेती उत्खनन करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार त्यांना दिनांक २४ फेब्रुवारी ते २० मार्च  या कालावधीत ४७८ ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार उत्खननास सुरुवात करण्यात येऊन शेतातील रेती डम्पिंग करून विविध वाहनाद्वारे विक्री करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतातील रेतीसह जेसीबी व ट्रॅक्टर जप्त; धानाेरा महसूल विभागाची कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : राजोली नदीपात्रालगतच्या शेतातून अवैधरीत्या  शेकडो ब्रास रेती चे उत्खनन करण्यात आल्याच्या माहितीवरून चातगावचे मंडळ अधिकारी व्ही. एन. मुपीडवार, दुधमाळाच्या तलाठी छाया टेकाम यांनी १० मार्च राेजी पंचनामा केला असता ३७१ ब्राॅस रेतीचे आगाऊ खनन केले असल्याचे आढळून आले आहे.  धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५  हेक्टर आर जागेतील रेती उत्खनन करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार त्यांना दिनांक २४ फेब्रुवारी ते २० मार्च  या कालावधीत ४७८ ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार उत्खननास सुरुवात करण्यात येऊन शेतातील रेती डम्पिंग करून विविध वाहनाद्वारे विक्री करण्यात येत आहे. दररोज ट्रक,  ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामध्ये मंजूर रॉयल्टीपेक्षा अधिकचे खनन झाल्याच्या कारणावरून मंडळ अधिकाऱ्यांनी माेका चौकशी करून मोजमाप केले असता ३७१ ब्रास रेती अवैधपणे उत्खनन केल्याचे आढळून आले. तेथे असलेली जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. असे असले तरी उत्खननाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. उत्खनन स्थळावर जाऊन पाहिले असता रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे दिसून येते सदर प्रकरणात काय कारवाई केली जाते. याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. याबाबत तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांना विचारले असता शेतमालकाला  नोटीस देण्यात आली असून, १५ तारखेला तहसील कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

रेती चोरी करणारा ट्रॅक्टर जप्तवैरागड: वन विभागाने बुधवारी पहाटे खोब्रागडी नदी पात्रात सापळा रचून रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे. जप्त केलेल्या ट्रॅक्टर विकास पोटे रा. विहीरगाव यांच्या मालकीचा आहे. खोब्रागडी नदीची रेती चोरून ती विकण्याचा गोरख धंदा मागील अनेक दिवसापासून काही ट्रॅक्टर मालक करीत आहेत ही बाब वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर दि.१० मार्च रोजी पहाटे आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो यांनी सापळा रचून ट्रॅक्टर जप्त केला. या ट्रॅक्टरवर अंदाजे १लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्राप्त माहितीनुसार आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी बुधवारच्या पहाटे खोब्रागडी नदीत तीन ट्रॅक्टर पकडले होते, पण दाेन ट्रॅक्टर रिकामे असल्याने ते साेडण्यात आले.

 

टॅग्स :sandवाळू