शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत सीसीटीव्ही नसेल तर होणार मान्यता रद्द !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:11 IST

शिक्षण विभागाचे कडक धोरण : मुख्याध्यापक लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बदलापूर शाळेतील विद्यार्थिनी शोषणाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य शासनाने लगबगीने निर्णय घेऊन सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य केले. जिल्ह्याच्या शहरी भागातील ७५ टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित २५ टक्के शाळांमध्ये कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरू आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये अजुनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. ग्रामीण भागातील मोठ्या गावातील हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

शाळांमध्ये सीसीटीव्ही आवश्यक शासनाच्या निर्णयानुसार सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयानंतर या कामी भिडल्या आहेत.

... तर शाळांची मान्यता रद्द शाळांच्या सीसीटीव्ही कार्यवाहीचा आढावा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरावर सातत्याने घेतला जात आहे. सीसीटीव्ही नसणाऱ्या शाळांची मान्यता पुढच्या शैक्षणिक सत्रात रद्द करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

जि.प. शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीअहेरी उपविभागातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अजुनही बसविण्यात आले नाही. 

इंग्रजी माध्यम शाळांमध्ये १०० टक्के सीसीटीव्ही गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज आदी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोली शहरातील बहुतांश शाळांनी आता कॅमेऱ्याची संख्याही वाढविण्याची माहिती आहे. प्रत्येक वर्ग, परिसर, प्रवेशद्वार, वहांडे तसेच तत्सम भागात कॅमेरे लावले आहेत. बिघडलेल्या कॅमेऱ्यांची दुरुस्तीही गतीने करण्यात आली. अनेक शाळांचे मुख्याध्यापक व कर्मचारी कॅमेरे विकत घेऊन तंत्रज्ञांना नेत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीSchoolशाळा