शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

गोनांचे विचार सर्व समाजासाठी कायम दिशादर्शक

By admin | Updated: January 12, 2015 22:49 IST

दंडकारण्य शिक्षण व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवून गोविंदराव मुनघाटे यांनी हलाखीच्या परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.

गडचिरोली : दंडकारण्य शिक्षण व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवून गोविंदराव मुनघाटे यांनी हलाखीच्या परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी आपल्या जीवनात नेहमी सेवेचा सकारात्मक दृष्टीकोण ठेवला. गो. ना. मुनघाटे यांचे कार्य व विचार सर्व समाजाला कायम दिशादर्शक राहतील, असे प्रतिपादन माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी केले. दंडकारण्य शैक्षणिक संस्थेच्यावतीने येथील विद्याभारती कन्या हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठान उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, सुधीर भातकुलकर, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुुनघाटे, दंडकारण्य संस्थेचे कोषाध्यक्ष माजी प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम स्व. कमलताई व गोविंदराव मुनघाटे यांच्या प्रतिमा पुजनाने मान्यवरांच्या हस्ते कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना खा. कोवासे म्हणाले. गोविंदराव मुनघाटे यांच्याशी माझा १९८० पासून संबंध आला. आयुष्यात त्यांच्याकडून आपल्याला सामाजिक दृष्ट्या नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले. पराभवाच्या काळातही त्यांनी मला धीर दिला. साहित्यीक, उत्कृष्ट शिक्षक, संस्थाचालक, समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य कायम स्मरणात राहिल, असेही कोवासे म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. उसेंडी व अरविंद पोरेड्डीवार यांनी गोविंदराव मुनघाटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी आयोजक समितीच्यावतीने स्लाईड प्रोजेक्टद्वारे गोविंदराव मुनघाटे यांच्या जीवनकार्यावरील चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाला दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संस्थेचे सदस्य पांडुरंग म्हशाखेत्री, एन. के. बानबले, भा. ना. मुनघाटे, सुरेश लडके, प्राचार्य के. वाय. वाघरे, अरूण मुनघाटे, प्रकाश पोरेड्डीवार, प्राचार्य संजय भांडारकर, प्राचार्य सागर म्हशाखेत्री, प्राचार्य विद्या आसमवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. तर संचालन व आभार प्रा. नरेंद्र आरेकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर गीतांचा कार्यक्रम झाला. (स्थानिक प्रतिनिधी)