शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 06:13 IST

गडचिरोली चिमूर मतदारसंघ : दारुमुक्त निवडणुकीचा संकल्प

गडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ‘मुक्तिपथ’ अभियानाच्या माध्यमातून दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प केला असून मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर न करण्याचा निर्धार जाहीर केला आहे.या मतदारसंघात एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुक्तिपथच्या आवाहनातून अनेक ठिकाणच्या महिलांनी दारूमुक्त निवडणुकीला प्रतिसाद देत ‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू’ असे फलक झळकविले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांनीही याचा धसका घेत मी व माझा पक्ष निवडणुकीत दारूचा वापर करणार नाही, असे लिहून दिले.

सर्चचे संचालक व मुक्तिपथचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी सर्व उमेदवारांचे त्यांच्या संकल्पाबद्दल आभार व्यक्त केले. ‘दारूमुक्त निवडणूक’ या अभियानामुळे निवडणुकीत बेकायदा दारूचा वापर व उमेदवाराचा खर्च कमी होईलच, सोबत मतदार पूर्ण शुद्धीत आपल्या विवेकाने मतदान करतील. हा खºया अर्थाने लोकशाहीचा विजय असेल, असे ते म्हणाले. या निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील प्रमुख उमेदवार अशोक नेते, डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.रमेशकुमार गजबे, देवराव नन्नावरे, हरिश्चंद्र मंगाम या सर्वांनी लिखित रुपात आपला हा संकल्प मुक्तिपथच्या स्वाधीन केला आहे.जनतेचा जाहीरनामाच बनावादरम्यान प्रशासकीय यंत्रणेने निवडणुकीत दारूचा गैरवापर थांबविण्यासाठी कारवाई सुरू केली असून जागोजागी वाहनांची तपासणी, दारूची जप्ती व वारंवार दारूचा गुन्हा करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. जनतेने, स्वयंसेवी संस्था, सामाजिक चळवळी आणि जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन जो उमेदवार मतदारांना दारू पाजेल त्यावर बहिष्कार टाकावा. हा एक प्रकारे जनतेचा जाहीरनामा बनावा, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीGadchiroliगडचिरोली