शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या छतातून पत्नीला शॉक देण्याचा पतीचा प्रयत्न! प्रयत्न फसल्यानंतर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:28 IST

चामोर्शी तालुक्यातील थरार : झोपेत मारण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूच्या आहारी गेलेल्या पतीने विद्युत खांबावर आकडा टाकून घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नी वाचली. चामोर्शी तालुक्याच्या नागपूर (चक) या गावात ५ फेब्रुवारीला हा थरार घडला. याप्रकरणी चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला असून पती फरार आहे. आशा माणिक सोयाम (४०) असे त्या होमगार्ड महिलेचे नाव आहे. त्या माहेरी नागपूर (चक) येथे वास्तव्यास आहेत.

पती संतोष मारोती शेडमाके (४५, रा. धानापूर, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) हा मजुरी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो दारूच्या आहारी गेलेला आहे. यातून तो आशा सोयाम यांच्याशी सतत वाद घालायचा. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे दोन वाजता संतोष शेडमाके हा घराच्या छतावर चढला. त्याने विद्युत खांबावरून आकडा टाकून वीज घेतली व लाकडी काडीच्या साहाय्याने कवेलू बाजूला सारून आशा यांना शॉक दिला. त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता कवेलून संतोष डोकावल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्याने धूम ठोकली. याबाबत आशा सोयाम यांनी फिर्याद दिली.

दोघांचाही पुनर्विवाहआशा सोयाम यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले, तर संतोष शेडमाके याने पत्नीशी फारकत घेतली. २०१५ पासून या दोघांनी पुनर्विवाह केला व एकत्रित राहू लागले. मात्र, नंतर संतोषला व्यसन जडले व त्यातून दोघांत खटके उडू लागले.

याआधी घरासमोर लावली होती आग२९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष शेडमाके याने घराच्या समोरील चाफ्याच्या झाडाला डिझेल टाकून आग लावली, यावेळी आशा सोयाम यांनी आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. याबाबत त्यांनी तेव्हाच पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली