शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रागाच्या भरात पतीने पत्नीच्या थोबाडीत मारली अन् ती गेली जिवानिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 19:23 IST

Gadchiroli News रागाच्या भरात पतीने पत्नीला दोन जोरदार झापडा मारल्या, पण यामुळे तिची प्रकृती आणखीच बिघडली आणि दवाखान्यात उपचार मिळण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली.

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आजारी असलेली पत्नी वेळेवर औषध घेत नाही, त्यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही, हे पाहून रागाच्या भरात पतीने पत्नीला दोन जोरदार झापडा मारल्या, पण यामुळे तिची प्रकृती आणखीच बिघडली आणि दवाखान्यात उपचार मिळण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना कोरची तालुक्यातील मुलेटीपदिकसा येथे शुक्रवारच्या दुपारी घडली. ( the husband slapped his wife in the mouth,  and she died)

प्राप्त माहितीनुसार, कोरची मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर मुलेटीपदिकसा हे गाव आहे. त्या गावातील सुबायबाई सुभाष धुर्वे (३५ वर्षे) यांची प्रकृती मागील अनेक दिवसांपासून बरी नव्हती. पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून सुभाष धुर्वे (४०) यांनी रुग्णालयात जाऊन औषधोपचार केले, पण त्या उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. पत्नी वेळेवर औषध घेत नाही, म्हणून सुभाषने रागाच्या भरात पत्नीच्या कानपटीत दोन झापडा मारल्या. यामुळे आधीच प्रकृती बरी नसल्यामुळे अशक्त झालेली सुबायबाई खाली कोसळली. त्यामुळे तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आले.

तिला तपासल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

सुबायबाईला दोन मुले व एक मुलगी आहे. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी कोरची पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू