लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: वन विभाग आलापल्ली अंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्र येथील आलापल्ली येथील खसरा विक्री आगार डेपोला अंदाजे 4.30 ते 5 च्या दरम्यान भीषण आग लागली असून या आगीत अंदाजे 500 हुन अधिक जळाऊ बीट आगीत जळून खाक झाले असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेआलापल्ली एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्ली पासून अवघ्या 1 कि मी अंतरावर असलेल्या अंदाजे 6 हेक्टर मध्ये पसरलेल्या या डेपोला आग लागली, आगीचे वृत्त समजताच तात्काळ वनाधिकारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, जोरदार सुरू असलेला वारा आणि डेपोतील सुकलेल्या सागवानी बिटामुळे आग आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते, वनविभागाने स्वत: चे पाणी आणि नगर परिषद अहेरीची फायर ब्रिगेडची गाडीच्या साहायाने प्रयत्न सुरु केले परंतु आग आटोक्यात येणे शक्य न दिसल्याने 2 जे सी बी लावून सध्या परिस्थितीत असलेले सागवानी बिट आगीपासून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतघटनास्थळी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, उपविभागीय वन अधिकारी नितेश देवगडे, वन परीक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे स्वत: आपल्या कर्मचारीसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,आग लागण्याचे नेमके कारण कोणते हे जरी लक्षात आले नाही तरी आजची ही आग नक्षल्यांनीे लावलेली नाही एवढे मात्र नक्की, परंतु या डेपो परिसरात अनेकदा अनेक युवक आई वडिलांपासून लपून सिगरेट आणि गांजा पिण्यासाठी डेपोच्या बिटाचा आड लपून बसून सिगरेट पिताना दिसतात त्यामुळे कुणी जर एखादी जळती सिगरेट जरी फेकली असेल तर यापासून आजचा हा घातपात होऊ शकतो असे चर्चा गावकरी करीत आहेत. वृत्त लिहले पर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.
आलापल्ली येथील आगाराला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:20 IST
वन विभाग आलापल्ली अंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्र येथील आलापल्ली येथील खसरा विक्री आगार डेपोला अंदाजे 4.30 ते 5 च्या दरम्यान भीषण आग लागली असून या आगीत अंदाजे 500 हुन अधिक जळाऊ बीट आगीत जळून खाक झाले असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
आलापल्ली येथील आगाराला भीषण आग
ठळक मुद्देआगीचे कारण अद्याप समजले नाही