शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची नोंदणीच केली नाही तर २१ लाख कसे मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 16:47 IST

४ सप्टेंबरपर्यंत मुदत : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान मागील वर्षीच्या सत्रापासून सुरू करण्यात आले. मागील वर्षी या अभियानाला शाळांनी चांगला प्रतिसाद दर्शवल्यानंतर यावर्षीही सदर अभियान राबवले जात आहे. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी शाळांनी त्यांच्या शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती भरायची आहे. मात्र अजूनही सुमारे २९९ शाळांनी रजिस्ट्रेशनही केलेले नाही. यावरून या शाळा सदर स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक शाळेने या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षण विभागामार्फत नियमित पाठपुरावा करून शाळांची नोंदणी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. 

आकडे बोलतात.... तालुका                             नोंदणी न केलेल्या शाळाअहेरी                                            ६६ आरमोरी                                         २१ भामरागड                                       १९चामोर्शी                                          ५४ देसाईगंज                                        २५ धानोरा                                            ११एटापल्ली                                       २३ गडचिरोली                                      १३ कोरची                                             ८ कुरखेडा                                          ४ मुलचेरा                                          २२ सिरोंचा                                           ३७

तीन पातळीवर बक्षिसेतीन लाख : तालुक्यावर पहिले बक्षीस ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख रूपये दिले जाणार आहे.जिल्हा स्तरावर ११ लाख : जिल्ह्यावर प्रथम आलेल्या शाळेला ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख रूपये दिले जाणार आहे.विभागस्तरावर २१ लाख : विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल

४ सप्टेंबरपर्यंत मुदत नोंदणीची सुरुवात ५ ऑगस्टपासून झाली आहे. शाळांना ४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून केंद्रस्तरावर मूल्यांकनाला सुरुवात होईल.

१ हजार ७१७ शाळांनी केली नोंदणी जिल्ह्यात १ हजार ६०६ प्राथमिक व ४१० माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ४२५ प्राथमिक व २९२ माध्यमिक शाळांनी नोंदणी केली आहे. १८१ प्राथमिक व ११८ माध्यमिक शाळांनी नोंदणी केली नाही. प्रत्येक शाळेने नोंदणी करणे आवश्यक आहे.

"सदर अभियानात सर्व शाळांनी सहभाग घ्यावा, यासाठी दरदिवशी पाठपुरावा केला जात आहे. सर्वच शाळा यात सहभागी करून घेतल्या जातील. विभाग स्तरावरील बक्षीस जिंकण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील." - बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाGadchiroliगडचिरोली