शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

सांगा, कसे होणार दिव्यांग कल्याण ?, लाचखोरीत अडकलेलेच कारभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:39 IST

पहिलाच नियुक्ती आदेश वादात : स्वतंत्र दर्जा मिळाल्याने १९९६ पदे मंजूर

संजय तिपालेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समाजकल्याण विभागांतर्गत कामकाज चालत असलेल्या दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, मात्र १५ एप्रिल रोजी केवळ पाचच जिल्ह्यांसाठी सक्षम अधिकारी नियुक्त केले. त्यापैकी दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाया झालेल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्र विभागाचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलाच नियुक्ती आदेश वादात सापडला आहे.

नव्याने निर्माण केलेल्या दिव्यांग कल्याण विभागात प्रशासकीय कामकाजासाठी ६७, आयुक्त कार्यालयासाठी १२, सात प्रादेशिक कार्यालयांसाठी प्रत्येकी १०, जिल्हास्तरावर कार्यालयासाठी प्रत्येकी १३, तालुकास्तरीय कार्यालयाकरिता प्रत्येकी ४ अशी एकूण १९९६ पदे मंजूर केली आहेत. दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सध्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि. प. यांच्यामार्फत केले जाते. तथापि, दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र झाल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांसाठी मंजूर केलेली पदे भरण्यासाठी सेवाप्रवेश नियम तयार करण्याची कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे.

जिल्हा व प्रादेशिक स्तरावरील कार्यालये सुरू करण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तसेच प्रादेशिक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अन्य विभागाकडील अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागवली आहे. यासंदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्त अनिल दिग्गीकर, उपसचिव विष्णुदास घोडके यांना वारंवार संपर्क केला, पण त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.

पाचच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कशा ?जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदावर पाचच जिल्ह्यांत नियुक्ती केल्या. याचा आदेश १५ एप्रिल रोजी जारी झाला. यात लातूर जिल्ह्याकरिता आर. जी. गायकवाड, अहिल्यानगरसाठी प्रशांत गायकवाड, सातारासाठी एल. जे. शेळके, धाराशिवकरिता सच्चिदानंद बांगर, तर जळगावला एम. एस. भागवत यांची नियुक्ती केली आहे. मूळ पदाचे काम पाहून त्यांना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये नेमणुका का केल्या नाहीत, पाच जिल्ह्यांसाठी नियुक्त्त्यांची घाई कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिव्यांगांचे कल्याण की अधिकाऱ्यांची सोय ?दरम्यान, दिव्यांग कल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या दोन अधिकाऱ्यांवर यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रशांत गायकवाड हे पुण्यातील दिव्यांग कार्यालयात कार्यरत आहेत, त्यांच्यावर सव्वाशे किलोमीटर अंतरावरील अहिल्यानगरची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्त्त्यांद्वारे दिव्यांगांचे कल्याण की अधिकाऱ्यांची सोय, असा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. या नियुक्त्त्या रद्द करून संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीGovernmentसरकार