शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साहेब... महागाई वाढली; दीड लाखांत घर बांधायचे कसे? प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी पुरेसा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:21 IST

अनुदान वाढवा : कोरची तालुक्यात १ हजार ५० घरे मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमधील १ हजार ५० तर नगरपंचायतमधील ७१ लाभार्थीना घरकुल मंजूर झाले आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरातील प्रत्येक घरकुल लाभार्थीला २६९ स्क्वेअर फुटमध्ये इमारत यासह शौचालय बांधकाम करणे आहे. यासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी जातो. नगरपंचायतमधील लाभार्थीला ३३० स्क्वेअर फुटमध्ये इमारत यासह शौचालय बांधकाम २ लाख ५० हजार रुपयांमध्ये करणे आहे; परंतु महागाईमुळे दीड व अडीच लाखांच्या निधीमध्ये साहेब घर बांधून होईल काय? असा प्रश्न घरकुलधारकांनी उपस्थित केला आहे.

दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे इमारत बांधकामातील रेती, गिट्टी, सिमेंट, सळाख, विटा अशा वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या कोरची तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या नियोजनात रेती घाट नाही. जिल्हा शासनाच्या वतीने प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास रेती मोफत दिली जात आहे; परंतु एवढ्याच रेतीत फक्त पायऱ्यापर्यंतच बांधकाम होत आहे. परिणामी कुरखेडा तालुक्यातून रेती आणावी लागते. त्यासाठी खर्च अधिक असल्याने लाभार्थी छोट्या नाल्यांमधील रेती उपसा करतात. 

काही ट्रॅक्टर मालक रेती पुरवतात परंतु महसूल विभागाकडून अशा ट्रॅक्टर मालकांवर प्रत्येकी १ लाख १८ हजार रुपयांचे दंड ठोठावणे सुरू केले आहे. घरकुलासाठी रेतीच मिळत नसल्याने अनेक लाभार्थीचे घरकुल बांधकाम अर्धवट राहिले असल्याचे दिसून येत आहे. 

नगर पंचायत क्षेत्रातही घरकुलतालुक्यातील २९ ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर १ हजार ५० लाभार्थीपैकी ५७७ घरकुलधारकांना पहिला हप्ता मिळाला आहे. पावसाळा संपल्यानंतर घर बांधकामांना सुरुवात होईल. सध्या नगरपंचायत अंतर्गत ७१ लाभार्थी असून १५ लाभार्थीचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे. ५६ लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

काय म्हणतात घरकुल लाभार्थी "मला शेवटच्या हप्त्याचा २० हजार रुपयांचा चेक मिळाला नाही. माझे • घरकुलाचे बांधकाम अपूर्णच आहे. पैसे केव्हा मिळतील याची वाट बघत आहे. शासनाने घरकुलाचे पैसे द्यावेत." - जैनकुमारी चंद्रकिशन बागडेरिया, घरकुल लाभार्थी रा. कोचीनारा.

"घराचे बांधकाम मी पूर्ण केले आहे; परंतु त्यापूर्वी नगरपंचायतच्या चकरा मारून मी कंटाळली आहे. अजूनही ९० हजार रूपये मिळणे शिल्लक राहले आहे." -अहिल्याबाई सांडील, घरकुल लाभार्थी कोरची

"शासनाने पीएम आवास योजनेतून लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या अनुदानामध्ये स्वतः ही पैसे खर्च करून घर बांधणे आहे. पूर्ण घर बांधण्यास अनुदान शासन देत नाही. केंद्र शासनाकडील निधी अजूनही आलेला नाही. त्यामुळे घरकुल धारकांचे हप्ते बाकी आहेत." - धम्मदीप साखरे, घरकुल अभियंता, नगरपंचायत कोरची

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली