शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महिला उभी असताना राखीव जागांवर तुम्ही कसे बसता भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग माेठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. बसमधील सीट आरक्षित असल्या तरी या आरक्षणाचा लाभ फार कमी जण घेतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीमध्ये दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट आरक्षित ठेवल्या जातात. मात्र या आरक्षणाबाबत दिव्यांग व महिला यांच्यामध्ये फारशी जागृती नसल्याने आरक्षित सीट असतानाही त्यांना उभे राहावे लागते. सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग माेठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. बसमधील सीट आरक्षित असल्या तरी या आरक्षणाचा लाभ फार कमी जण घेतात. आरक्षित सीटवर पुरुष प्रवासी बसलेला असताना महिला किंवा दिव्यांगांना उभे राहून प्रवास करावे लागत असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. 

वाहकाची भूमिका काय?महिलेच्या आरक्षित जागेवर पुरुष बसला असेल व गर्दीमुळे महिला उभी असेल तर सीट आरक्षित सीट मिळण्यासाठी महिलेने वाहकाकडे तक्रार करावी. वाहक आरक्षित सीट महिलेला उपलब्ध करून देईल. 

तक्रार हाेईपर्यंत कुणी कुठेही बसू शकताे

एसटीमध्ये असलेले आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे. त्यामुळे जाेपर्यंत त्या आरक्षणाचा प्रवासी येत नाही ताेपर्यंत त्या सीटवर कुणालाही बसण्याचा अधिकार आहे. संबंधित व्यक्तीने वाहकाकडे तक्रार केल्यानंतर त्याला सीट देण्यासाठी बसलेल्या प्रवाशाला ते सीट साेडावी लागेल.

बसने प्रवास करताना आमदाराला बघितले का? 

एसटीची निर्मिती झाली त्यावेळचे आमदार कदाचित गरीब असावेत त्यामुळे ते एसटीने प्रवास करीत असल्याने विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य  या दाेघांसाठी दाेन सीट आरक्षित ठेवले आहेत. मात्र आत्ताचे आमदार निवडून आल्याबराेबर महागड्या चारचाकी गाड्यांमधून फिरतात ते कधीच एसटीत बसत नाही. त्यामुळे त्यांचे आरक्षण फालतूच असल्याचा आराेप प्रवाशांकडून हाेत आहे. 

या क्रमांकाच्या सीट राहतात आरक्षित

आमदारांसाठी ७ व ८ क्रमांकाची सीट आरक्षित राहते. अपंगांसाठी ३, ४, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५, ६, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसाठी ११, १२, पत्रकारांसाठी १९, २९, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ३० व महिलांसाठी १३, १४, २०, २७, २८ क्रमांकांचे सीट आरक्षित राहते. 

आरक्षित सीटबाबत संबंधित प्रवाशाने तक्रार केल्यास वाहक ते सीट संबंधित व्यक्तीला उपलब्ध करून देतात. - मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली

 

टॅग्स :state transportएसटी