शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीन व्यक्तींच्या खात्यात कशे आले धानाचे बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:19 IST

Gadchiroli : उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिले चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा राज्य शासनाने सरसकट हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, चामोर्शी तालुक्यात काही भूमिहीन व्यक्तींच्या खात्यातही धानाचा बोनस जमा झाल्याची तक्रार उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झाली. यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाने पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. धान बोनस गैरव्यवहाराची व्याप्ती किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात धान भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी नवीन नाही. त्यात आता धान बोनस वाटपातही गैरव्यवहाराची तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पिपरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घोटाळ्यासंबंधित दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीनुसार, चामोर्शीत भूमिहीन व्यक्तींच्या नावे शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना दोन ते तीन हजार देऊन उर्वरित रक्कम इतरत्र वळती करण्यात आली. उपमुख्यमंत्री कार्यालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर गैरव्यवहार करणारे रडारवर येण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात पणन महासंघाचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही. 

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ? यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या घोटाळ्यात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या बोगस लाभाथ्यांची यादीच तक्रारीसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmer strikeशेतकरी संपfarmingशेती