शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

रूग्णालय कर्मचाऱ्यांचा संसार उघड्यावरच

By admin | Updated: November 22, 2014 23:01 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचारी कॉलनीतील निवासस्थानांचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर तीन कंत्राटदारांमध्ये ताळमेळ नसल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या घरातील

गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचारी कॉलनीतील निवासस्थानांचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर तीन कंत्राटदारांमध्ये ताळमेळ नसल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या घरातील सामान उघड्यावर पडले आहे. त्याचबरोबर रात्रीसुध्दा कुडकुडत्या थंडीत बाहेरच झोपावे लागत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी रूग्णालयाच्या मागे स्वतंत्र कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार यांचे एकूण १५० निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांच्या दुरूस्तीचे काम कंत्राटदारांच्या मार्फतीने मागील ८ दिवसांपासून सुरू आहे. निवासस्थानाची पेटींग करणे, टाईल्स लावणे व दरवाजे बसविण्यासाठी तीन स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या तिनही कंत्राटदारांच्या कामगारांचा ताळमेळ नाही. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. टाईल्सचे काम करणारे मजूर येऊन टाईल्स लावण्यासाठी घरातील सामान काढायला लावतात. टाईल्स लावण्यासाठी ४ ते ५ मजूर आहेत. सदर मजूर एका निवासस्थानाला टाईल्स लावण्यासाठी दोन दिवस लावतात. त्यानंतर ते निघून जातात. आणखी एक-दोन दिवसानंतर दरवाजे लावणारे मजूर येतात. सदर मजुरही घरातील सामान काढायला लावतात. दरवाजे लावण्याचे काम झाल्यानंतर आणखी सामान घरामध्ये ठेवल्या जाते. त्यानंतर रंगरंगोटी करणारे मजूर येऊन घरातील सामान काढायला लावतात. या सर्व प्रकारामुळे येथील कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर एका क्वॉर्टरचे काम अपूर्ण असताना ते पूर्ण करण्याऐवजी अनेक घरात काम सुरू करून कुणाचेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी तसदी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास या तीन कंत्राटदारांच्या पध्दतीमुळे सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टाईल्स व्यवस्थित लावण्यात आल्या नाही. टाईल्स लावल्यानंतर शौचालय व बाथरूमला दरवाजा लावण्यात आला नाही. काही दरवाजे व्यवस्थित लागतच नाही. खिडक्यांना तावदाने लावण्याची तरतूद आहे. मात्र खिडक्या तावदाणेसुध्दा लावण्यात आले नाही. प्रत्येक किचन ओट्यामध्ये बेसीन लावण्यात आली आहे. मात्र पाणी निघण्यासाठी मार्ग देण्यात आला नाही. काही दरवाजे नवीन असले तरी त्यांना कब्जे मात्र जुनेच लावण्यात आले आहेत. बांधकामानंतर निर्माण झालेला कचरा निवासस्थानांच्या मागेच फेकण्यात आला आहे. या सर्व बाबींकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)