शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे नसल्यास आता गृह विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

ज्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच ज्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना हा पर्याय निवडता येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्ण शहरी भागात राहणारा असावा, तसेच त्याचाकडे घरी स्वतंत्र राहण्याची तसेच शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मात्र सध्याच या पयार्याचा लाभ घेता येणार नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : घरात पुरेशा सुविधा असणाऱ्यांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्या लक्षात घेता आता लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहण्याबाबतचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. याबाबत संमती आणि निर्णय संबंधित रुग्णाला घ्यावा लागेल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. हा निर्णय घरात विलगिकरणासाठी आवश्यक सुविधा असणाºयांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.ज्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच ज्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना हा पर्याय निवडता येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्ण शहरी भागात राहणारा असावा, तसेच त्याचाकडे घरी स्वतंत्र राहण्याची तसेच शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मात्र सध्याच या पयार्याचा लाभ घेता येणार नाही.लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणाची सोय त्याच्या स्व:इच्छेने देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडील रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता सद्या एक हजारापर्यंत आहे. तसेच आता क्रियाशिल रुग्ण ५६५ आहेत. तरीही काही रुग्णांची घरी राहण्याची ईच्छा असल्यास त्यांना अटी व शर्तीनुसार मुभा दिली जाणार आहे.घरीच उपचार घेणाºयांना हे करावे लागणारएखाद्या रुग्णाला घरी राहण्यास परवानगी दिल्यानंतर सोबत एक माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध सूचना, घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती राहणार आहे. तसेच संबंधित रुग्णाकडे ऑक्सिमीटर, थर्मोमीटर असल्यास त्याच्या नोंदी दैनंदिन स्वरुपात त्या पुस्तिकेत नोंदवायच्या आहेत.ऑक्सिमीटर नसेल तर आरोग्य विभाग काही अग्रीम रक्कम भरुन ऑक्सिमीटरही पुरवठा करणार आहे. प्रत्येक गृह विलगीकरणातील रुग्णाने दररोज त्या पुस्तिकेत दोन वेळा प्राणवायुची (एसपीओ २), नाडीचे ठोके, तापमान याबाबत नोंदी लिहायच्या आहेत.जर काही लक्षणे आढळून आली तर त्या पुस्तकात नमूद संपर्क क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावयाची आहे. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा, आरोग्य सेवक यांची नेमणूक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.कोरोना चाचणीबाबत गैरसमय ठेवू नका- सीईओ आशीर्वादकोरोनाबाधित आहे किंवा नाही या बाबत तपासणीकरीता वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅन्टीजन (रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट) पद्धतीबाबत नागरिकांनी गैरसमज करु नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार अ‍ॅन्टीजन तपासणीत कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांची नोंद बाधित म्हणूनच घेतली जाते. यामध्ये या पद्धतीवर अविश्वास दाखविता येत नाही. सदर रुग्णाची पून्हा आरटीपीसीआर ही तपासणी करु नये अशा मार्गदर्शक सूचना आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या