शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठिकठिकाणी वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:35 IST

वाढीव वीज दर तसेच अतिरिक्त वीज दराचा विरोध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली, कुरखेडा व घोट येथे वीज बिलांची होळी केली. विदर्भातील जनतेचे विजेचे बिल निम्मे करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देवीज बिल निम्मे करा : दरवाढीचा तीव्र विरोध; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढीव वीज दर तसेच अतिरिक्त वीज दराचा विरोध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली, कुरखेडा व घोट येथे वीज बिलांची होळी केली. विदर्भातील जनतेचे विजेचे बिल निम्मे करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.गडचिरोली : विदर्भात विजेची निर्मिती होते. यामुळे प्रदुषणाचा सर्वाधिक त्रास विदर्भवासीयांना सहन करावा लागतो. तरीही वीज बिलात कोणतीही सुट दिली जात नाही. उलट अतिरिक्त दर आकारून आगाऊची रक्कम वसूल केली जात आहे. याचा विरोध करण्यासाठी गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले. वीज बिलाची होळी सुध्दा करण्यात आली. महावितरणचे गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, जिलहा सचिव डॉ. देवीदास मडावी, उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, प्रभाकर बारापात्रे, सुलोचना मडावी, डी. डी. सोनटक्के, पांडुरंग घोटेकर, दत्तात्रय बर्लावार, दत्तात्रय पाचभाई, पी. टोपरे, तुळसाबाई खोबरे, गोवर्धन चव्हाण, चंद्रशेखर जक्कनवार, रमेश भुरसे, एजाज शेख, विश्वनाथ भिवापुरे यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते हजर होते.घोट : येथील बसस्थानक चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत नागरिकांनी मोर्चा काढला.येथील ३३ केव्ही उपकेंद्रासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये विदर्भ आंदोलन समिती दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, बाबुराव भोवरे, दिनकर लाकडे, बंडू जुवारे, उमाजी कुद्रपवार, गिरीश उपाध्ये, राजू गोयल, परशुराम दुधबावरे, प्यारेलाल डोंगरे, समीर भोयर, गौर शहा, अमित शहा, अश्विनी वडेट्टीवार, आरीफ सय्यद, दीपक लाकडे, अनिता पोरेड्डीवार, अमर शहा, आबाजी वैरागडे, मंजुळाबाई काटवे, संगीता वडेट्टीवार, कमल येनप्रेडीवार, भारत पाटील हजर होते. मागणीचे निवेदन वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता वाळके यांना देण्यात आले.कुरखेडा : विदर्भ राज्य आंदोलन समिती कुरखेडाच्या वतीने उपविभागीय अभियंता कार्यालय कुरखेडासमोर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आंदोलन करून वीज बिलाची होळी केली. मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविले. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह मरकाम, तालुकाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुका उपाध्यक्ष रमेश मानकर, युवा आघाडी अध्यक्ष ज्ञानचंद सहारे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सेवाराम ठेला, रामचंद्र कोडाप, मिना भोयर, शिला इस्कापे आदी हजर होते.

टॅग्स :electricityवीज