गडचिरोली : 'रस्ते म्हणजे देशाची प्रगती' असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अभिमानाने सांगतात, पण गडचिरोलीतल्या कंत्राटदारांनी या प्रगतीचे अक्षरशः 'वाभाडे' काढलेत ! चामोर्शी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचा (क्र.३५३) हा अवतार पाहून हा रस्ता की पेशंट, असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. करोडो रुपये खर्च करून चामोर्शी-गडचिरोली हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधण्यात आला खरा, पण लोकार्पण व्हायच्या आतच याला पडलेल्या खोल भेगांनी कामाच्या दर्जाची पोलखोल केली. आता हा रस्ता दुरुस्त करण्याऐवजी, चक्क एखाद्या पेशंटला 'टाके' मारावेत, तसा प्रकार गोविंदपूरजवळ सुरू आहे. सरकारच्या तिजोरीतून बांधलेल्या या रस्त्याची ही मलमपट्टी पाहून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी काँग्रेसचे पदाधिकारी दवडणार कसे? काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी हे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत या प्रकरणावरून सरकार व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.
ज्या रस्त्यावरून अवजड खनिज आणि औद्योगिक वाहतूक होते, तिथे हे 'टाके' किती दिवस टिकणार? हा प्रश्न आहेच, पण तूर्त हे 'शिवणकाम' करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, हे पाहणेही औत्सुक्याचे. एकीकडे जिल्हा माओवादमुक्तीच्या दिशेने झेपावतो आहे, पण नवकोरे रस्ते 'आजारी' पडत असतील अन् त्यावर थातूरमातूर 'मलमपट्टी' केली जात असेल तर प्रगतीच्या मार्गात काटे कोण पेरतोय? असा सवाल उपस्थित होणे साहजिक आहे. आता बेजबाबदारपणाच्या या आजारावर मंत्री नितीन गडकरी काय जालीम इलाज करतात हे पाहणे औत्सुक्याचे.
Web Summary : Gadchiroli's Chamorshi-Gadchiroli highway, built with crores, developed cracks before its inauguration, revealing poor construction. Instead of proper repairs, it's being patched up like a patient, raising questions about durability and accountability. This sparks criticism and concerns about hindering progress in the Maoist-affected district.
Web Summary : गढ़चिरौली के चामोर्शी-गढ़चिरौली राजमार्ग, जो करोड़ों में बना, उद्घाटन से पहले ही दरारें आ गईं, जिससे घटिया निर्माण का पता चला। उचित मरम्मत के बजाय, इसे एक रोगी की तरह पैच किया जा रहा है, जिससे स्थायित्व और जवाबदेही पर सवाल उठ रहे हैं। इससे माओवादी प्रभावित जिले में प्रगति में बाधा आने की चिंता और आलोचना बढ़ रही है।