शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून जाणारा महामार्ग झाला अरूंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:51 IST

गडचिरोली शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांची रूंदी इतर ठिकाणच्या महामार्गापेक्षा कमी करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हा मार्ग शहरातही चौपदरीच राहणार असून एका बाजुच्या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, .....

ठळक मुद्दे चौपदरी असूनही कोंडीची शक्यता : भविष्यात समस्या वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांची रूंदी इतर ठिकाणच्या महामार्गापेक्षा कमी करण्यात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र हा मार्ग शहरातही चौपदरीच राहणार असून एका बाजुच्या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने सहज जाऊ शकतील, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजुने १५-१५ मीटर आहे. त्यात मध्यभागी रस्ता दुभाजक नाही, पण दोन्ही बाजूने असणाºया नालीत ३.५ मीटर रस्ता जाणार आहे. हा रस्ता गडचिरोली शहरात मात्र मध्यभागापासून दोन्ही बाजुने १२-१२ मीटरच राहणार आहे. त्यात दोन्ही बाजूची नाली मिळून ३.५ मीटर तर मधातील रस्ता दुभाजकासाठी २.५० मीटर जागा जाणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने नाली व रस्ता दुभाजक सोडून ९-९ मीटरचाच रस्ता शिल्लक राहणार आहे. या रस्त्यावरून एका बाजुने दोन वाहने जाऊ शकत असली तरी भविष्याचा विचार करता ही रूंदी अपुरी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता भूमी अभिलेखच्या रेकॉर्डनुसार शहरातून जाणाºया महामार्गाची (एका बाजुची) रूंदी १२ मीटरच आहे. त्यामुळे इतर महामार्गाप्रमाणे १५ मीटर जागा मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.गडचिरोली शहरात होणाºया या अरूंद महामार्गामुळे आणि भविष्यात त्यावर अतिक्रमण झाल्यास वाहतुकीची कोंडी आणि अपघात वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.बायपास मार्गासाठी सर्वेक्षणशहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून जड वाहनांची वाहतूक झाल्यास कोंडी निर्माण होईल. शिवाय अपघाताची शक्यताही बळावते. त्यामुळे जड वाहनांसाठी शहराच्या बाहेरून बायपास मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण झाले असून त्या कामाला मंजुरी मिळायची बाकी आहे. भविष्यात तो मार्ग झाल्यास शहरातील बरीच वाहतूक तिकडे वळती होईल.

टॅग्स :highwayमहामार्गGadchiroliगडचिरोली