शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आलापल्ली-भामरागड, वडधा-देवापूर, आष्टी ते मुलचेरा या मार्गावरील दिना नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच पोहार नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटानजीकच्या नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : गडचिरोली शहरातील घरांसह सरकारी कार्यालयेही जलमय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन घरांची पडझड झाली. शिवाय अनेक मार्गही बंद झाले आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजतापासून गडचिरोली शहरात चार तास मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे शहरात हाह:कार माजविला. नागरी वस्त्या, सरकारी कार्यालयांसह रस्तेही पूर्णपणे जलमय झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. गडचिरोली शहरात ४ तासात १८५.२ मिमी पाऊस बरसल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली आहे.अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आलापल्ली-भामरागड, वडधा-देवापूर, आष्टी ते मुलचेरा या मार्गावरील दिना नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच पोहार नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटानजीकच्या नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. संततधार पावसामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशय १०० टक्के भरला असून वेस्टवेअरमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान रेगडी जलाशयाला आता पर्यटनाचे रूप आले असून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत. चामोर्शी-मार्र्कंडादेव मार्गावरील नाल्यावर पाणी चढल्याने हा मार्ग सकाळपासूनच बंद होता.चामोर्शी शहरासह तालुक्यात पावसाने कहर केला. चामोर्शी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मार्गावर सकाळच्या सुमारास दोन फूट पाणी होते. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून येथून ३६८२ क्यूमेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. चिचडोह बॅरेजचेही ३८ गेट उघडण्यात आले असून येथून ८३०२.२४ क्यूमेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.तळोधी (मो.) परिसरातही पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने येथील मुख्य रस्त्यालगत मोरेश्वर भोयर व प्रकाश भोयर यांचे घर कोसळले. यावेळी कुटुंबीय घरातील साहित्य बाहेर काढत होते. हातातील सामान फेकून देऊन मागे सरकल्याने ते बचावले. तसेच रस्त्यावर कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. शेजारच्या रमेश भोयर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. रामपुरी टोली येथील पोयाम बाबुराव ठाकूर यांचे घर कोसळले. केशव भोयर, नक्टू शेरकी, प्रभाकर लिंगोजवार, रमेश चाटारे, लक्ष्मण आदे, भाऊजी भोयर यांच्या घरांची पडझड झाली आहे. मुरमुरी नदीच्या पुलावर पाणी वाढले असल्याने येडानूर, कुथेगाव, जोगना, लसनपेठ, ढेकणी, मुतनूर आदी मार्ग बंद झाले आहेत.गडचिरोली शहरातील रस्ते आणि वस्त्याही पाण्याखालीगडचिरोली शहरात रोजच पावसाची हजेरी सुरू आहे. मात्र बुधवारी सकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तब्बल चार तास पावसाने गडचिरोली शहराला झोडपून काढले. या पावसामुळे चामोर्शी, आरमोरी, चामोर्शी व मूल या चारही मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परिणामी वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली. चामोर्शी मार्गापासून रेड्डी गोडाऊन ते पोटेगावकडे जाणाऱ्या मार्गावर दोन फूट पाणी वाहत होते. चामोर्शी मार्गावर राधे बिल्डींगच्या परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे याही मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याच्या परिसरात रस्त्यावर प्रचंड पाणी होते. तसेच खड्डेही असल्यामुळे त्यातून वाहन काढताना मोठी कसरत होत होती. त्यामुळे ट्राफिक जाम झाले होते. पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. गडचिरोलीचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी स्वत: फिरून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.धानोरा मार्गावर बसस्थानक आणि गडचिरोली नगर परिषदेच्या परिसरात गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने चांगलीच तारांबळ उडाली. पंचायत समितीचा आवारही पूर्णपणे जलमय झाला होता. युनियन बँक परिसर व त्यालगतच्या दुकानाच्या चाळीमध्येहीे पावसाचे पाणी शिरले होते. विवेकानंदनगर, कन्नमवारनगर, अयोध्या नगरातील रस्ते पूर्णत: पाण्याखाली होते. मोकळ्या भूखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागातील ५० वर घरांमध्ये पाणी शिरले. गोकुलनगर तलावालगतच्या बºयाच घरांमध्ये पाणी शिरले. विसापूर व कॉम्प्लेक्स भागातही पावसाने कहर केला. विसापूर मार्गावरील नाल्यावर अडीच फुट पाणी होते. त्यामुळे या मार्गावरील बंद होती.पुरात अडकलेल्यांना पोलिसांची मदतमंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागड तालुक्याच्या ताडगावजवळील कुडूम नाला व कुमारगुड्डा नाला दुथळी भरून वाहत असल्याने काही लोक दोन्ही नाल्यामध्ये अडकले होते. नाल्याच्या पुरात अडकून पडलेल्या नागरिकांना ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन दोरीच्या सहाय्याने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सर्व नागरिकांना ताडगाव पोलीस मदत केंद्रात आणून या ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारला कुडूम नाल्याचा काही भाग वाहून गेल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. जेसीबीद्वारे हा खड्डा बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाऊस आणखीच वाढत असल्याने नाल्यावर पाणी चढले. परिणामी नाला दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला. नाल्याच्या पलिकडे अडकलेल्या लोकांना ताडगाव पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी सुरक्षितरित्या ताडगावकडे बाहेर काढण्यात यश मिळविले.अनेक ठिकाणी घरांची पडझडचामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे संततधार पावसामुळे दोन घरांची अंशत: पडझड झाली आहे. विजय नामदेव डांगे व सिंधूबाई मारोती दहिकर यांच्या घराची पडझड झाल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तलाठी धनराज शेडमाके, सरपंच वनीता पोरेड्डीवार, पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, कोतवाल, मोरेश्वर साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचानामा केला. नुकसानभरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. गडचिरोली शहराच्या इंदिरानगर वॉर्ड क्र.५ मधील माता मंदिराजवळील कांताबाई एकनाथ वासेकर यांचे घर पावसाने कोसळले. मदतीची मागणी वासेकर यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस