शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अहेरी व भामरागडात दमदार पाऊस; इतरत्र रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 20:05 IST

Gadchiroli News अहेरी व भामरागड या दाेन तालुक्यांना पावसाने झाेडपून काढले. इतर तालुक्यांमध्ये मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती.

गडचिराेली : अहेरी व भामरागड या दाेन तालुक्यांना पावसाने झाेडपून काढले. इतर तालुक्यांमध्ये मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. विशेष म्हणजे, अजूनही काही तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. २१ जून राेजी गडचिराेली तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात मान्सून काेसळला. चार दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काेसळत असलेल्या पावसावरून जिल्ह्यातही दमदार पाऊस हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र अजूनही दमदार पाउस झाला नाही. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात भीती बाळगतच पेरणीची कामे आटाेपत आहेत. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. तर साेमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू हाेती. मात्र, माेठा पाऊस आला नाही. दुसरीकडे अहेरी व भामरागड तालुक्याला पावसाने चांगलेच झाेपडून काढले. अहेरी तालुक्यात ४८.८ मिमी, तर भामरागड तालुक्यात ३३.१ मिमी पाऊस पडला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण २० मिमी पेक्षा कमीच आहे.

कुरखेडा व देसाईगंजला पावसाची हुलकावणीजिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. मात्र देसाईगंज व कुरखेडा या तालुक्यांना पावसाने हुलकावणी दिली आहे. देसाईगंज तालुक्यात २६ जूनपर्यंत केवळ ४.३ मिमी पाऊस पडला आहे. तर कुरखेडा तालुक्यात एकही पाऊस पडला नाही. त्यामुळे या दाेन्ही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशाच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.२८ जूननंतर विश्रांती ?

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २७ जून राेजी मंगळवारी जिल्ह्याच्या अगदी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस हाेईल. २८ जूननंतर मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविली आहे. हाच अंदाज नागपूर, वर्धा, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठीही वर्तविला आहे.

टॅग्स :Rainपाऊस