शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:44 IST

जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

ठळक मुद्देसंततधार पावसाने घरे कोसळली : तलाव व बोड्यांमधील जलसाठ्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.एटापल्ली : तालुक्यातील वासामुंडी मार्गावरील मरकल नाल्यावरील पुलावर पाणी चढल्याने जीव धोक्यात घालून या मार्गाने जाणारे नागरिक, वाहन चालक पुलावरून प्रवास करीत होते. एटापल्लीपासून एक किमी अंतरावर डुम्मी नाला आहे. या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे डुम्मी व जवेली या गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटू शकतो. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाजवळील डांबरी रस्त्याचा काही भाग खचला आहे. सततच्या पावसामुळे दरवर्षी हा भाग खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या कशीबशी एसटी जाते. पुन्हा डांबरी भाग खचल्यास वाहन जाणे कठीण होणार आहे.अहेरी : पावसामुळे अहेरी आगारातून सुटणाऱ्या एटापल्ली-जारावंडी, सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-टेकडा या मार्गावरील बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.चामोर्शी : तालुक्यातील कानोली येथील मोहन मारोती देवतळे यांच्या घराची भिंत पावसामुळे ८ जुलै रोजी कोसळली. यावेळी देवतळे कुटुंब घरातच झोपले होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यामुळे १० हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र अजूनपर्यंत पंचनामा केला नसल्याची माहिती देवतळे यांनी दिली.विजेअभावी भामरागडातील जनजीवन ठप्पभामरागड तालुक्यात मागील चार दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी भामरागड येथील वीज पुरवठा खंडीत झाला तेव्हापासून मंगळवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तीन दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत असल्याने सर्वच कार्यालयांमधील बॅटऱ्या पूर्णपणे डिस्चार्ज झाल्या. विजेअभावी बँक आॅफ महाराष्ट्रमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले होते. शासकीय कार्यालयातीलही संगणक बंद पडल्याने शासकीय कर्मचारी केवळ कार्यालय उघडून रिकामे बसले होते. विजेअभावी पेट्रोलपंप बंद आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काही वाहनधारक ६५ किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली येथून पेट्रोल-डिेझेल आणत आहेत. बीएसएनएल सेवाही ठप्प पडली होती.भामरागडपासून चार किमी अंतरावर असलेल्या कुमरगुडा तसेच १२ किमी अंतरावर असलेल्या ताडगाव नाल्यावरील पुलावर मंगळवारी दुपारी पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहनधारक मात्र पाणी असतानाही पुलावरून वाहन टाकत होते. पाऊस ओसरल्याने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पुलावरील पाणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर