शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

आरोग्य कर्मचारी आंदोलनावर

By admin | Updated: June 25, 2015 01:53 IST

आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत.

चार महिन्यांपासून पगार नाही : सीईओंनी आश्वासन पाळले नसल्याचा आरोपगडचिरोली : आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत. वेतन मिळावे, या मागणीसाठी बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर तसेच प्रत्येक तालुकास्थळावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा प्रभावीत होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा मुख्यालयात तीव्र निदर्शने केली.सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या नेतृत्त्वात करण्यात येत आहे. यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना आदींचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहे. मागील चार महिन्यांपासून वेतन न झाल्याने १० दिवसांत वेतन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. आश्वासन देऊनही वेतन झालेले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. बँकेचे कर्ज, मुलांचा शैक्षणिक खर्च आदी भागविण्यासह अडचण निर्माण झाली आहे. याबाबीच्या निषेधार्थ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य कर्मचारी संघटनेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.जिल्हास्तरावरील आंदोलनाचे नेतृत्त्व जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खरवळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटनेचे अध्यक्ष शैलेश जांभुळे, औषधी निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अतुल अलमपटलार, विनोद सोनकुसरे, जे. यू. टिंगणे, हेमंत पेशट्टीवार, एच. एम. कोटरंगे, एस. आर. धाबाडे, विवेक मून, अनिल मंगर, निलू वानखेडे, भुरसे, आनंद मोडक आदींनी केले. आंदोलनात दाभाडे, चल्लारवार, फुलझेले, कुथे, राऊत, एम. व्ही. बानबले, आर. यू. भटारकर, व्ही. एल. बोरकर, पी. बी. म्हशाखेत्री, कुळमेथे, पी. डब्ल्यू. गेडाम, सोनुले, कावळे, बारसागडे, कुरेशी, जांभुळे, जाधव, कडू, शेंडे, कोडापे, अल्लीवार, नैताम आदींसह बहुसंख्य आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.जि. प. प्रशासनाने तत्काळ वेतन न काढल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करू, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. बुधवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांनी मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)