शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

गडचिरोली जिल्ह्यातील नगरवासियांचे आरोग्य धोक्यात; जलस्त्रोत तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 07:00 IST

अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाण्याचे नमुने ग्रामपंचायती असताना तपासण्यात आले होते. या शहरांचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाने या ठिकाणचे नमुने घेणे बंद केले आहे.

ठळक मुद्देअहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचामधील स्थिती

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार नगर पंचायतींच्या हद्दीतील जलस्त्रोतांची तपासणी करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाण्याच्या शुध्दतेविषयी प्रशासन अनभिज्ञ असून ऐन पावसाळ्यात या चारही नगरांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने मोफत तपासून दिले जातात. अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाण्याचे नमुने ग्रामपंचायती असताना तपासण्यात आले होते. या शहरांचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाने या ठिकाणचे नमुने घेणे बंद केले आहे. पाण्याचे नमुने तपासणे आता संबंधित नगर पंचायत प्रशासनाचीच जबाबदारी आहे. प्रत्येक स्त्रोताच्या रासायनिक तपासणीसाठी १ हजार ४०० रुपये व जैविक तपासणीसाठी ८०० रुपये असा एकूण २ हजार २०० रुपये खर्च येतो. वर्षातून दोन वेळा या जलस्त्रोतांची तपासणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच एका जलस्त्रोतासाठी वर्षातून ४ हजार ४०० रुपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामपंचायत असताना एटापल्लीतील १३०, अहेरीतील ११५ व सिरोंचा ७० व भामरागड तालुक्यातील ९० जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती. ही तपासणी त्यावेळी मोफत झाली होती. आता मात्र नगर पंचायतीला लाखो रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे जलस्त्रोतांच्या तपासणीकडे दुर्लक्ष होत आहे. नगर पंचायतीकडे निधी नसल्याचे कारण त्यासाठी सांगितले जात आहे. पण यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

अहेरी नगर पंचायतीचा प्रभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे जलस्त्रोतांची तपासणी होऊ शकली नाही. शासनामार्फत विविध योजनांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. जलस्त्रोतांची तपासणी हा सुध्दा महत्त्वाचा भाग आहे. यासाठीही स्वतंत्र निधी शासनाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जलस्त्रोतांची तपासणी लवकरच केली जाईल.- अजय साळवे, मुख्याधिकारी, नगर पंचायत एटापल्ली व अहेरी

आरओ प्लान्टचीही तपासणी नाहीअहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुक्यांमध्ये शुध्द म्हणविल्या जाणाऱ्या थंड पाण्याचा व्यवसाय तेजीत आहे. या चारही शहरांमध्ये जवळपास ५० आरओ प्लान्ट आहेत. प्रत्येक आरओ प्लान्टची महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल राहते. त्यामुळे त्यांनी पाण्याचे नमुने तपासणे आवश्यक आहे. मात्र प्लान्टधारकही नमुने तपासत नाही. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असलेल्या नगर पंचायत, ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन विभागाचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.

 

टॅग्स :Waterपाणी