शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी अडल्याने आराेग्य धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

गडचिराेली : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनावर ...

गडचिराेली : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात

आरमाेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जळाऊ लाकडाचा पुरेसा पुरवठा नाही

अहेरी : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वन कायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. हा प्रश्न सोडविण्याची अशी तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

बीएसएनएलची सेवा ठरली कुचकामी

झिंगानूर : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या वतीने सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात दूरसंचार सेवा दिली जाते. मात्र गेल्या काही महिन्यापासून कव्हरेजची समस्या माेठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भ्रमणध्वनीधारकांचा एकमेकांशी संपर्क हाेत नाही. परिणामी बीएसएनएलची सेवा या भागात कुचकामी ठरली आहे.

लाईनमन नसल्याने ग्रामस्थांची अडचण

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्तीची मागणी

सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिले अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.

घरपट्टे मिळण्यास हाेताहे विलंब

गडचिरोली : शहरात गोकूलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे.

फळांच्या दुकानांची तपासणी करा

वैरागड : विविध प्रकारची फळे कृत्रिमरित्या कॅल्शिअम कार्बाईडने पिकविली जात असून अशा फळांची गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. असे फळ खाल्ल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे. पाण्याने धुऊन तसेच कपड्याने पुसून ताजे फळ असल्याचे भासवून अनेक जण त्याची विक्री करीत आहेत.

कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद

धानोरा : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.

कोटगूल येथे आयटीआय मंजूर करा

कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धाेरणाने या शिक्षणाची वाट लागली आहे.

अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा

गडचिराेली : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला

देसाईगंज : सध्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ७० ते ९० रुपयांना मिळणारे तेल पाकीट आता १२० ते १४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. पेट्रोलच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

अहेरी : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो.

मोकळ्या जागेची स्वच्छता करा

अहेरी : शहरातील अनेक मोकळ्या जागेत व प्लाॅटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. हा कचरा प्लाॅटधारकांच्या खासगी जागेत असल्याने स्वच्छता कर्मचारी तो साफ करत नाही. त्यामुळे या ठिकाणी आणखी कचरा फेकला जातो. यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन शहर सौंदर्य बाधित करत आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

भामरागड : सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो, याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडतो आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. शिवाय शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी केली आहे.

अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी

धानाेरा : जिल्ह्यात सिंचन विहीर योजनेची काही कामे झाली आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, अनेकांना अनुदान मिळाले नाही.

बेरोजगारांना निधी उपलब्ध करावा

आष्टी : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.

शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसाहाय्य

आरमाेरी : मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांनी केली आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.

अनेक कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच

कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे फावले आहे.