लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत २५२ पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसात ६ हजार ८२५ कुटुंबातील १८ हजार ९५२ नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू केली आहे. नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व भागात प्रशासनाच्यावतीने २५८ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचाही समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान ५० घरांना भेटी देणार आहेत. हे पथक घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन पातळी मोजण्यासोबतच कोरोनाचे संशयित रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करणार आहेत. तेथे कोविड १९ च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येऊन पुढील उपचार केले जाणार आहेत.नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी.सध्या असलेल्या आजारांवरील उपचार सुरू ठेवावे, त्यात खंड पडू देऊ नये, ताप आल्यास अथवा थकवा जाणवू लागल्यास रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही प्रशासनाकडून केले आहे.दोन फेऱ्यांमध्ये होणार सर्व्हेक्षणजिल्ह्यात ही मोहीम दोन टप्प्यात २५ ऑक्टोबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. पहिली फेरी १० ऑक्टोबर २०२० पर्यंत पूर्ण होईल तर दुसरी फेरी १४ ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवसांचा तर दुसऱ्या फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे.
आतापर्यंत १८,९०० नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू केली आहे. नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व भागात प्रशासनाच्यावतीने २५८ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचाही समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान ५० घरांना भेटी देणार आहेत.
आतापर्यंत १८,९०० नागरिकांची आरोग्य तपासणी
ठळक मुद्देमाझे कुटुंब-माझी जबाबदारी : जिल्ह्यात ५५२ पथकांमार्फत सुरू आहे मोहीम