शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

चाेरीच्या पैशाच्या वादातून त्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 22:58 IST

१८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीनही आराेपी व मृत युवक हे तलावाच्या पाळीवर दारू पिण्यासाठी एकत्र आले. दारूच्या हिश्शावरून कुमाेद व राेशन यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणादरम्यान राेशनने लाेखंडी राॅडने कुमाेदच्या डाेक्यावर जबर प्रहार केला. यात कुमाेद जागीच गतप्राण झाला. ताे मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपींनी त्याला पाण्यात ढकलून दिले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली :  रेव्हेन्यू काॅलनीतील कुमाेद लाटकर या युवकाचा मंगळवार, २० सप्टेंबर राेजी आठवडी बाजाराजवळ असलेल्या तलावात मृतदेह आढळला हाेता. या प्रकरणातील दाेन आराेपींना गडचिराेली पाेलिसांनी माेठ्या शिताफीने २३ सप्टेंबर राेजी अटक केली. चाेरीच्या पैशाच्या वादातूनच एका आराेपीने कुमाेदची हत्या केल्याचा पाेलिसांचा अंदाज  आहे. राेशन पवनसिंग ठाकूर (३५) व अमाेल नामदेव दडमल (२५) (दाेघेही रा. चनकाई नगर, गडचिराेली) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. तर नीलेश मारकवार हा आराेपी फरार आहे. १८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीनही आराेपी व मृत युवक हे तलावाच्या पाळीवर दारू पिण्यासाठी एकत्र आले. दारूच्या हिश्शावरून कुमाेद व राेशन यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणादरम्यान राेशनने लाेखंडी राॅडने कुमाेदच्या डाेक्यावर जबर प्रहार केला. यात कुमाेद जागीच गतप्राण झाला. ताे मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपींनी त्याला पाण्यात ढकलून दिले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मृतक कुमाेद हा चाेरी करायचा तसेच त्याला दारूचे व्यसन हाेते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. मात्र, शवविच्छेदनादरम्यान त्याच्या डाेक्यावर वार आढळून आले.  त्यामुळे त्याची हत्याच झाल्याचे स्पष्ट झाले. यातील दाेन आराेपींना अटक केली असून, तिसरा आराेपी फरार आहे. दरम्यान, अटक केलेल्या आराेपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. रात्रीची घटना असल्याने आराेपींचा शाेध घेणे अतिशय कठीण काम हाेते. गडचिराेली पाेलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात एपीआय पूनम गाेरे, पीएसआय संघमित्रा खाेब्रागडे, स्नेहल चव्हाण, चेतनसिंग चव्हाण यांनी गाेपनीय माहिती काढत आराेपींना अटक केली. 

आराेपी व मृतक करायचे चाेरी आराेपी राेशन ठाकूर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. त्याच्यावर चाेरीचे तीन, दारू विक्रीचा एक गुन्हा दाखल आहे. राेशन एका चाेरीच्या गुन्ह्यात तुरूंगात गेला हाेता. ताे नुकताच जामिनावर सुटून आला हाेता. यादरम्यान ताे व कुमाेद दाेघेही चाेरी करायचे, अशी कबुली राेशनने दिली आहे. चाेरीच्या पैशाच्या वादातूनच त्याने हत्या केल्याचा अंदाज आहे. 

गुन्हा कराल तर सुटणार नाही मागील सहा महिन्यांच्या कालावधीत गडचिराेली पाेलीस ठाण्यांतर्गत चार खुनाचे गुन्हे घडले आहेत. यात आशीर्वाद नगरातील युवकाचा खून, पुलखल येथील युवकाचा खून, राम नगरातील व्यक्तीचा खून, कुमाेदच्या हत्येच्या प्रकरणाचा समावेश आहे. या चारही प्रकरणांत आराेपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गडचिरेाली पाेलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पाेलिसांनी चारही प्रकरणांतील आराेपींना जेरबंद केले आहे.

पूर्वनियाेजित कट रचून हत्यादारूच्या नशेत आपण कुमाेदची हत्या केल्याचे राेशन पाेलिसांना सांगत आहे. मात्र, पाेलिसांचा त्याच्या बाेलण्यावर विश्वास नाही. कारण तलावाच्या पाळीवर लाेखंडी राॅड आला कुठून, असा प्रश्न आहे. खून करण्याच्या इराद्यानेच राेशनने लाेखंडी राॅड साेबत आणून पूर्वनियाेजित कट रचून हत्या केल्याचा अंदाज आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी