शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कंबरभर पाण्यातून त्याने काढला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी असताना पुलावरून चालत पैलतीर गाठण्याचे ठरविले. त्यांचे हे धाडस अपघाताला आमंत्रण देणारे ठरले असते. पण ते कसेतरी पैलतीर गाठण्यात यशस्वी झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड ते आरमोरी मार्गावरील रामाळा घाटामध्ये असलेल्या गाढवी नदीच्या पुलावरून बुधवारी कमरेपेक्षा जास्त पाणी वाहत होते. अशा स्थितीतही जीव धोक्यात घालून एका शेतकऱ्याने पूल ओलांडण्याचे धाडस दाखविले. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असला तरी असे नसते धाडस जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे असा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथील एका शेतकऱ्याची रामाळा येथे शेती आहे. बुधवारी तो शेतावर गेला होता. दरम्यान, गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी असताना पुलावरून चालत पैलतीर गाठण्याचे ठरविले. त्यांचे हे धाडस अपघाताला आमंत्रण देणारे ठरले असते. पण ते कसेतरी पैलतीर गाठण्यात यशस्वी झाले.

पोलीस बंदोबस्त ठेवा वास्तविक पुराच्या पाण्याचा वेग अधिक असतो. याशिवाय खाली गाळ जमलेला असल्यामुळे पाण्यातून जाताना पाय घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे असे धाडस कोणी करू नये आणि अनुचित घटना टाळण्यासाठी अशा पुलांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर