शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दिव्यांगांसाठी 350 गुन्हे डोक्यावर घेऊन फिरतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:54 IST

बच्चू कडू : १७ जिल्ह्यांत गेलो, दिव्यांगांच्या दारी अभियानात दोनच ठिकाणी आमदार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  दिव्यांगांच्या कल्याणासाठी डोक्यावर साडेतीनशे गुन्हे घेऊन फिरतो, चार गुन्ह्यांत दोन वर्षांची शिक्षाही झाली. मात्र, दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका  घेऊन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत १७ जिल्ह्यांत गेलो; पण दोनच ठिकाणी आमदार कार्यक्रमांना उपस्थित होते, अशा शब्दांत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली.  दिव्यांग या व्यक्ती पहाडाएवढे दु:ख घेऊन जगतात, त्यांच्या वेदना समजून घ्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम आरमोरी रोडवरील संस्कृती लॉनमध्ये २७ सप्टेंबरला झाला. यावेळी आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, जि. प. सीईओ आयुषी सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची उपस्थिती होती. 

यावेळी बच्चू कडू म्हणाले, १५ वर्षांपासून दिव्यांगांच्या न्याय-हक्कासाठी लढत आहे. विधानसभेत एकही भाषण दिव्यांगांचा शब्द उच्चारल्याशिवाय केलेले नाही.  या दरम्यान ३५० गुन्हे नोंद झाले. चार गुन्ह्यांत दोन वर्षांची शिक्षा झाली; पण ८२ शासन निर्णय काढण्यात यश आले. दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी खर्च झाला पाहिजे, त्यांना सोयी- सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सगळीच कामे राजकारणासाठी करायची नसतात तर कर्तव्य म्हणूनही करावी लागतात, हे कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांंगांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. जि. प. सीईओ आयुषी सिंह, आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी यांची भाषणे झाली. दीड हजारांवर लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. मित्र संस्थेचे अभिजित राऊत यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

उपमुख्यमंत्र्यांसह खासदार, मंत्रीही अनुपस्थितया कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. रामदास अंबटकर  निमंत्रित होते; पण या सर्वांचीच अनुपस्थिती होती. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूGadchiroliगडचिरोली