शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जमीन हडपून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करा

By admin | Updated: September 20, 2015 02:01 IST

शेतजमीन खरेदी करताना आपल्या मर्जीतील साक्षिदार उभे करून विक्री पत्र करून शेतीचा करारनामा न करता शेतीची पाच लाख रूपये किमत ठरविली.

असाहयतेचा फायदा उचलला : पोलिसांनी कारवाई करण्याची हनुजी निंबोळ यांची मागणीगडचिरोली : शेतजमीन खरेदी करताना आपल्या मर्जीतील साक्षिदार उभे करून विक्री पत्र करून शेतीचा करारनामा न करता शेतीची पाच लाख रूपये किमत ठरविली. वेगवेगळ्या दिवशी चार टप्प्यात केवळ १ लाख ५० हजार रूपये दिले व उर्वरित रक्कम बँकेत फिक्समध्ये टाकले म्हणून शेतीच्या खरेदीची रक्कम पूर्ण न देता शेती हडपणाऱ्या आरोपी टेंभा येथील नरेंद्र गोविंदा ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी चांभार्डा येथील शेतकरी हनुजी शिवा निंबोळ यांनी केली आहे.हनुजी निंबोळ यांनी म्हटले आहे की, सेबीने काळ्या यादीत टाकलेल्या एका कंपनीचा एजंट असलेल्या नरेंद्र ठाकरे याने २४ मार्च २०१५ रोजी आपली शेतजमीन त्यांनी स्वत:च्या पत्नीच्या नावे खरेदी केली. खरेदी करताना आपल्या मर्जीतील साक्षिदार उभे करून विक्रीपत्र करून घेतले. शेतीचा करारनामा न करता पाच लाख रूपये किमत ठरवून वेगवेगळ्या दिवशी चार टप्प्यात केवळ १ लाख ५० हजार रूपये दिले. उर्वरित रक्कत बँकेत फिक्समध्ये टाकले म्हणून काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपनीच्या पावत्या दिल्या. सदर बँकेची चौकशी केली असता, सेबीने जाहीर केलेली बोगस कंपनी आहे, असे आढळून आले. त्यानंतर नरेंद्र ठाकरे यांच्याशी पैशाबाबत विचारणा केली असता, तुम्हाला जे जमते ते करून घ्या, अशी धमकी दिली. जमीन खरेदीतील उर्वरित रक्कमेची गुंतवणूक करताना आरोपीने आपली परवानगी घेतली नाही व परस्पर गुंतवणूक करून फसवणूक केली. या घटनेची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात जून २०१५ मध्ये दिली असता, पोलिसांनी थातूरमातूर चौकशी करून आपल्याला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले. त्यानंतर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे तक्रार दिली असता, १४ जुलै २०१५ रोजी नरेंद्र ठाकरे याच्यावर ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आरमोरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांनी आरोपीवर गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. यावरून आरमोरी पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली वागत आहेत, असे दिसून येत आहे. आरोपीवर गुन्हा नोंदविण्यासंबंधी चौकशी केली असता, आम्ही तपास करीत आहोत, असे सांगण्यात येत आहे. आरोपीवर गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याला अद्यापही अटक करण्यात आली नाही. आरोपीने बोगस कंपनीत पैशाची गुंतवणूक करून शेती हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी हनुजी निंबोळ यांनी केली आहे. आरोपीस अटक न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही निंबोळ यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)