लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमत हे कायम विश्वासार्हता जपलेले वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राने सामाजिक बांधिलकी जोपासत अन्यायाविरूध्द लढा उभारून आपली प्रतिमा कायम ठेवली. त्यामुळे लोकमत आणि दिवसाची सुरूवात हे माझ्या जीवनातील एक समीकरण झाले आहे, असे मत येथील ज्येष्ठ जनरल प्रॅक्टिशनर तथा अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी व्यक्त केले.जागतिक आरोग्य संघटनेनेही वर्तमानपत्रामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची कसलीही भिती मनात न बाळगता लोकांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे आणि आपल्या ज्ञानात भर पाडावी, असे डॉ.कुंभारे म्हणाले.लोकमत वृत्तपत्रातील संपादकीय लेख माणसांच्या विचारांना प्रेरणा देणारे असतात. अभ्यासपूर्ण बातमी, आकर्षक मांडणीमुळे लोकमत हे इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत अधिक सरस असते.लोकमत हा सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. गेल्या ३५ वर्षापासून मी लोकमतसह इतर वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करतो. सर्वात आधी मी लोकमतपासून वृत्तपत्र वाचनाची सुरूवात करतो, असेही डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी यावेळी सांगितले.वंदनिय राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार व कार्याचा उत्तमरित्या प्रचार व प्रसार करण्याचे लोकमत वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे. लोकमत ही सामाजिक चळवळ आहे, त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळातही नियमितपणे वृत्तपत्राचे वाचन करावे, असे डॉ.कुंभारे म्हणाले.वृत्तपत्र हाताळण्यातून कोरोनाचा संसर्ग होतो, असे जर कोणी म्हणत असेल तर हा निव्वळ बालिशपणा आहे. त्याला कुठलाही आधार नाही. जर वृत्तपत्रातून कोरोना झाला असता तर आज जिल्ह्यात हजारो कोरोना पॉझिटिव्ह दिसले असते.
वृत्तपत्र हाताळण्यातून कोरोनाचा संसर्ग मुळीच होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST
जागतिक आरोग्य संघटनेनेही वर्तमानपत्रामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची कसलीही भिती मनात न बाळगता लोकांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे आणि आपल्या ज्ञानात भर पाडावी, असे डॉ.कुंभारे म्हणाले. लोकमत वृत्तपत्रातील संपादकीय लेख माणसांच्या विचारांना प्रेरणा देणारे असतात. अभ्यासपूर्ण बातमी, आकर्षक मांडणीमुळे लोकमत हे इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत अधिक सरस असते.
वृत्तपत्र हाताळण्यातून कोरोनाचा संसर्ग मुळीच होत नाही
ठळक मुद्देडॉ.शिवनाथ कुंभारे । ‘लोकमत’ वृत्तपत्राची विश्वासार्हता कायम