शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडिला, अधुरी एक कहाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

गेल्या तीन-चार दिवसांपासून दुर्गाची प्रकृती बरी नसल्याने तिला चक्कर आली होती. त्यामुळे औषधोपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्गाची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर तिच्याशी लग्न जुळलेला युवकही गडचिरोलीत आला. दवाखान्यात भरती करण्याच्या दिवसापासून तर दुर्गा अखेरचा श्वास घेईपर्यंत हा युवक तिच्यासोबत होता.

ठळक मुद्देलग्नापूर्वीच दुर्गावर काळाची झडप : संसाराचे स्वप्न भंगले, साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लग्न जुळल्यानंतर सुखी संसाराचे स्वप्न उपवर-वधू पाहात असतात. यादरम्यान सुरू होणाऱ्या संवादातून मानसिक व भावनिक नाते अधिक घट्ट होते. आपले लग्न कुटुंबीय व आप्तेष्ठांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात होईल, अशी अपेक्षा असते. तसेच स्वप्नही ते रंगवत असतात. असेच स्वप्न दुर्गा व तिच्या होणाऱ्या पतीने पाहिले होते. मात्र नियतीने दुर्गावर अकाली झडप घातली. लग्न ठरलेल्या दिवशी दुर्गा सर्वांना सोडून कायमची गेली. त्यामुळे अहेरी येथील ‘त्या’ युवकाच्या कहाणीच्या सुरूवातीला शेवट झाला.ही हृदयद्रावक घटना १ जून रोजी सोमवारी घडली. अहेरी येथील लग्न जुळलेल्या मुलाशी बोहल्यावर चढून वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याआधीच शहराच्या हनुमान वॉर्डातील रहिवासी दुर्गा गुरनुले (२९) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. गेल्या तीन-चार दिवसांपासून दुर्गाची प्रकृती बरी नसल्याने तिला चक्कर आली होती. त्यामुळे औषधोपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्गाची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर तिच्याशी लग्न जुळलेला युवकही गडचिरोलीत आला. दवाखान्यात भरती करण्याच्या दिवसापासून तर दुर्गा अखेरचा श्वास घेईपर्यंत हा युवक तिच्यासोबत होता. दरम्यान तो युवक दुर्गाची दवाखान्यात खूप काळजी घेऊन तिला धीर देत होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.१ जून रोजी दुर्गा विवाहबद्ध होणार होती. मात्र याच दिवशी तिला काळाने हिरावून नेल्याने तिच्या कुटुंबासह सासरकडील मंडळी व वॉर्डवासीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दुर्गाच्या होणाऱ्या पतीचे अहेरी येथे आलापल्ली मार्गावर दुकान आहे. दुर्गाच्या अंत्यसंस्काराला तिच्या सासरकडील मंडळींनीही उपस्थिती लावली. त्यांनाही दु:ख अनावर झाले होते.दुर्गाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.दोन मुलीच्या अकाली जाण्याने कुटुंबावर आघातगडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील गुरनुले कुटुंबात तीन मुली जन्माला आल्या. दुर्गाला दोन बहिणी होत्या. मोठी बहिण परिचारिका होती. मात्र चार वर्षांपूर्वी गरोदरपणात तिचा मृत्यू झाला होता. आता हृदयविकाराच्या झटक्याने दुर्गाचा मृत्यू झाल्याने गुरनुले कुटुंबावर आघात झाला. दोन मुलींचे अकाली निधन झाल्याने आईवडील व आप्तेष्ठांनी हंबरडा फोडला.

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यू