शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

४६ वर्षांपासून पूल अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडादेव येथे महामुनी मार्र्कंडेश्वराचे पुरातन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे २१ फेब्रुवारीपासून १० दिवस जत्रा भरणार आहे. मात्र गेल्या ४६ वर्षांपासून वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पूल तसाच कायम आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्याबाहेरील भाविकांना नदीतून कसरत करत मार्र्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते.

ठळक मुद्देमार्र्कं डादेव येथील समस्या : जिल्ह्याबाहेरील भाविकांची ससेहोलपट कायम

संतोष सुरपाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडादेव येथे महामुनी मार्र्कंडेश्वराचे पुरातन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे २१ फेब्रुवारीपासून १० दिवस जत्रा भरणार आहे. मात्र गेल्या ४६ वर्षांपासून वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पूल तसाच कायम आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्याबाहेरील भाविकांना नदीतून कसरत करत मार्र्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते. भाविकांकडून सातत्याने मागणी होऊनही प्रशासनाने सदर पुलाचे काम पूर्ण केलेले नाही.मार्र्कंडेश्वर मंदिराच्या पायथ्यापासून वैनगंगा नदी वाहते. याच वैनगंगा नदीवर गेल्या ४६ वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया पुलाचे काम हाती घेण्यात आले. सदर पूल अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे भाविकांना यात्रेदरम्यान त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भरणाºया यात्रेदरम्यान भाविकांसाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून तात्पुरत्या स्वरूपाचा रपटा तयार करण्यात येतो. यावर्षी सुद्धा असा रपटा तयार करण्यात आला आहे. रपटा बनविण्यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहे. मात्र येथील समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली नाही. मार्र्कंडा या तीर्थस्थळी दरवर्षी राज्य शासनाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी भेट देऊन पाहणी करतात. समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी नदीपात्रातील अर्धवट पूल आजही अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ स्थितीत आहे.२१ फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱ्या जत्रेला चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो भाविक मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यांना कच्च्या स्वरूपाच्या रपट्यावरून पायी ये-जा करावी लागते. पावसाळ्यात पुलाअभावी हा मार्ग बंद असतो. आता तरी शासनाने मार्र्कंडा येथील वैनगंगा नदीपात्रातील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा समस्ता शिवप्रेमी भाविकांकडून केली जात आहे.जिल्हा प्रशासन जबाबदारी घेणार का?मार्र्कंडादेव येथे मार्र्कंडेश्वराचे पुरातन तीर्थस्थळ आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, मराठा धर्मशाळा व इतर ट्रस्टतर्फे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. यात चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांचाही मोठा सहभाग असतो. मात्र नदीपात्रात पूल नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना अधिकचे अंतर कापून तसेच फेरा मारून यावे लागते. जत्रेच्या सर्व सोयीसुविधा पुरविण्याची व नियोजनाची जबाबदारी तहसील कार्यालय चामोर्शी यांच्याकडे आहे. शिवाय गडचिरोली जिल्हा प्रशासनाचाही या मंदिराशी संबंध आहे. मात्र नदीपात्रात मजबूत स्वरूपाचा पूल बांधण्यासाठी कोणत्याही यंत्रणेने आजपर्यंत गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. त्यामुळे नदीपात्रात पूल उभारण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :riverनदी