देसाईगंज शहर हे व्यापारीदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने व मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याशी जोडले गेले असल्याने या मार्गांवरून नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. शहरातील अनेक पशुपालक आपली जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. ही जनावरे दिवसा टाकलेला बाजारातील भाजीपाला खातात. बाजारात फिरत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागताे.
रात्रीच्या वेळेस हीच मोकाट जनावरे राष्ट्रीय महामार्गावर घोळक्याने बस्तान मांडून बसत असल्याने अनेकदा मुख्य मार्गांवरील वाहतुकीचा खोळंबा होताे. या वेळी अपघाताचा धाेका नाकारता येत नाही.
बाॅक्स
...तर तीव्र आंदाेलन करणार
शहरातील ही समस्या नागरिकांनी नगर प्रशासनाच्या लक्षात आणून दिली हाेती. लिखित तक्रारी करूनही काहीच उपयाेग झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त हाेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
250721\img_20210724_095913.jpg
देसाईगंज शहरात मुख्यमहामार्गावर जनावरे यांचा ठिय्या.