शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिमलगट्टा आरोग्य केंद्र समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:54 IST

जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मदार असलेल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

ठळक मुद्देरूग्णवाहिका नादुरूस्त : डॉक्टरांची अनुपस्थिती

संजय गज्जलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मदार असलेल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. उमानूर (सुदागुडम) येथील रणजीत मल्लेश गावडे या तीन वर्षाच्या मुलाला हगणव, उटली, ताप असल्याने त्याला ३ जून रोजी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. रणजीतची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अहेरी येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र या ठिकाणची एमएच ३३-९३२५ क्रमांकाची रूग्णवाहिका मागील आठ दिवसांपासून ब्रेक फेल असल्याने बंद स्थितीत आढळून आली. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मरपल्ली उपकेंद्रासाठी देण्यात आलेली रूग्णवाहिका होती. मात्र त्याची चावी मिळत नव्हती. त्याचबरोबर या रूग्णवाहिकेत डिझेल सुध्दा नव्हते.येंकाबंडा येथील गरोदर माता ज्योती सुनिल सिडाम हिला २ जून रोजी सायंकाळी ७ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तिला झटके येत होत. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिलाही अहेरी येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याही वेळी चावी व डिझेल उपलब्ध नसल्या कारणाने १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवावी लागली. सदर रूग्णवाहिका तब्बल चार तासानंतर रात्री १.३० वाजता जिमलगट्टा येथे पोहोचली. या अगोदर २८ मे रोजी रसपल्ली येथील चंद्रकला प्रभाकर दुर्गे हिला प्रसुतीसाठी जिमलगट्टाच्या दवाखान्यात भरती करायचे होते. मात्र रूग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे दोन दिवसानंतर कुटुंबातील व्यक्तींनीच गरोदर मातेला दवाखान्यात भरती केले. दुसऱ्या दिवशी अहेरी येथे रेफर करण्यात आले. त्याही वेळी १०८ ची रूग्णवाहिका बोलविण्यात आली. मागील १० दिवसांपासून येथील दोन्ही रूग्णवाहिका बंद स्थितीत आहेत. प्रत्येक वेळी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन लावावे लागते. सदर रूग्णवाहिका सुध्दा वेळेवर पोहोचत नाही. परिणामी एखाद्या रूग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. औषधीसाठा सुध्दा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.वॉटर कुलर बनले शोभेची वस्तूजिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात वॉटर कुलर बसविण्यात आले आहे. मात्र सदर वॉटर कुलर सुध्दा अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी रूग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्राची साफसफाई सुध्दा करण्यात आली नव्हती.डॉक्टरांच्या अनुपस्थितीतबाबत तालुका आरोग्य अधिकारी इशांत तुटकर यांच्याशी संपर्क केला असता, ३ व ४ जून साठी आवलमारीचे वैद्यकीय अधिकारी दरवडे यांना रूजू केले असल्याचे सांगितले. मात्र ३ जून रोजी एकही डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नव्हता. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.