शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावांत पोहोचला ज्ञानरचनावाद

By admin | Updated: February 27, 2016 01:40 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत सर्व मुलांना १०० टक्के प्रगत करण्याचे उद्दिष्ट आहे.

भामरागड तालुका : प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीभामरागड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत सर्व मुलांना १०० टक्के प्रगत करण्याचे उद्दिष्ट आहे. शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता दुर्गम गावांत गटशिक्षणाधिकारी दरडमारे यांच्या वतीने भेटी देऊन ज्ञानरचनावादावर मार्गदर्शन केले जात आहे.भामरागड तालुक्यातील शाळांंना गटशिक्षणाधिकारी दरडमारे व केंद्रप्रमुख, साधन व्यक्तींच्या माध्यमातून भेटी दिल्या जात आहेत. या अंतर्गत कसनसूर शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेत १०० टक्के उपस्थिती, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन, शाळेची बाह्यांग व अंतरंग सजावट, परिसर स्वच्छता, गुणवत्तापूर्ण शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी साधन व्यक्ती चांगदेव सोरते, केंद्रप्रमुख जोशी उपस्थित होते. संचालन अमोल दुर्याेधन यांनी केले. तीरकामेटा येथे केंद्रसंमेलनसमूह साधन केंद्र भामरागडद्वारा आयोजित भामरागड केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन जि. प. शाळा तीरकामेटा येथे नुकतेच पार पडले. केंद्र अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे होते. उद्घाटन उपक्रमशील साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक व विशेषतज्ज्ञ जगने उपस्थित होते. केंद्र संमेलनात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, विद्यार्थी क्षमता व कौशल्याचे विकसन, शाळा बाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्या प्रगतीसाठी विशेष कृती कार्यक्रम, १०० टक्के विद्यार्थी उपस्थिती व १०० टक्के गुणवत्ता, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन करणे या विषयीचे मार्गदर्शन उपक्रमशील साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी केले. ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती कशी आहे, याबाबत चर्चा केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन केंद्रे तर आभार जगने यांनी मानले.