गडचिराेली : कृषी विभागामार्फत नवनिर्वाचित सरपंचांच्या कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले. या कार्यशाळेदरम्यान शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी याेजनांची माहिती देण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. सरपंच हा गावातील अतिशय महत्त्वाचा पद आहे. कृषी विभागाच्या याेजना राबविताना सरपंचांनी पुढाकार घेतल्यास प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास मदत हाेईल, असे मार्गदर्शन करून विविध याेजनांची माहिती देण्यात आली. या याेजना शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचविण्यापर्यंत आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला कृषी उपसंचालक अरूण वसवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहणे, मंडळ अधिकारी चेतन चलकलवार, महेंद्र दिहारे आदी उपस्थित हाेते. कार्यशाळेला २७ सरपंच हजर हाेते.
फाेटाे... कार्यशाळेला उपस्थित एसएओ भाऊसाहेब बऱ्हाटे, बाजुला प्रदीप वाहणे व अन्य.
===Photopath===
250321\25gad_1_25032021_30.jpg
===Caption===
कार्यशाळेला उपस्थित एसएओ भाऊसाहेब बऱ्हाटे, बाजुला प्रदीप वाहणे व अन्य.