शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पित नक्षल्यांना राेजगाराबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST

गडचिराेली : आत्मसमर्पित नक्षल युवक-युवती स्वावलंबी बनावे, या उद्देशाने गडचिराेली पाेलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने १६ फेब्रुवारी राेजी ...

गडचिराेली : आत्मसमर्पित नक्षल युवक-युवती स्वावलंबी बनावे, या उद्देशाने गडचिराेली पाेलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने १६ फेब्रुवारी राेजी नवेगाव येथे राेजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. या मेळाव्याला ३२० आत्मसमर्पित नक्षल युवक-युवती उपस्थित हाेते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख उपस्थित हाेते. यावेळी घरकुल प्रमाणपत्र व ८१ जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

मार्गदर्शन करताना पाेलीस अधीक्षक गाेयल म्हणाले, आत्मसमर्पण केल्यास शासन काेणतीही मदत करीत नाही, अशी चुकीची माहिती नक्षलवादी चळवळीतील व्यक्तींना देतात. मात्र हे खाेटे असून पाेलीस दल शासन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या नेहमी पाठीशी राहते. त्यांच्या आवडीनुसार राेजगार दिला जाईल, भूखंडावर जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी लाईट व पाण्याची व्यवस्थाही करून दिली जाईल. दर महिन्याला विकासकामांचा आढावा घेतला जाईल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान सहायक जिल्हाधिकारी येरेकर, जि. प.चे मुख्य कार्यकारी कुमार आशीर्वाद यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी आत्मपसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी गंगाधर ढगे आदींनी सहकार्य केले.