२०१४-१५ चा निधी : नेते, होळी व गजबे यांनी मंजूर केली १ कोटी ६९ लाखांची कामेलोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीगतवर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. जिल्ह्याला नवीन लोकप्रतिनिधी मिळाले. या लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मतदार संघात विकास कामे प्रस्तावित/मंजूर केले आहे. निधीतून काम मंजुरीच्या कामात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी २०१४-१५ या वर्षात २७.७५ लाख रूपयांचे काम मंजूर केले आहेत. तर खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी व आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी १ कोटी ६९ लाख ४९ हजार रूपयांचे कामे प्रस्तावित केली आहेत.अशोक नेते यांना मिळणारा खासदार निधी हा सहा विधानसभा क्षेत्रात खर्च करावा लागतो. यात गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत. खासदार अशोक नेते यांनी १ कोटी २९ लाख ७३ हजार रूपयांचे काम तीन विधानसभा क्षेत्रात प्रस्तावित केले असल्याची माहिती मिळाली आहे.नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून सीसी रोड, खडीकरण, सभामंडप बांधकाम, शाळा संरक्षण भिंती, सिमेंट काँक्रीट नाली आदी कामे केली जाणार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सन २०१४-१५ या वर्षात २७ लाख ७५ हजार रूपयांचे काम प्रस्तावित केले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी २७ लाख २६ हजार रूपयांचे काम मतदार संघात मंजूर केले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी आपल्या मतदार संघात ३७ लाख ५० हजार रूपयांचे काम मंजूर केले आहे. यामध्ये रंगमंच बांधकाम, खुल्या सभा मंडपाचे बांधकाम, सिमेंट काँक्रीट रस्ता आदी कामांवर अधिक निधी त्यांनी मंजूर केला आहे. आमदार गजबे यांनी सन २०१४-१५ मध्ये १० कामे मंजूर केले आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या निधीतून १२ कामे मंजूर केले आहे. तर खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली व आरमोरी या दोन विधानसभा मतदार संघात जवळजवळ २३ कामे मंजूर केले असून अहेरी विधानसभा क्षेत्रात २५ लाख रूपयांची कामे त्यांनी मंजूर केली असल्याची मौखिक माहिती आलापल्ली येथील बांधकाम खात्याकडून देण्यात आली आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या अहेरी विधानसभा मतदार संघात १९ कामे मंजूर केले आहे. यामध्ये १६ कामे ही अहेरी तालुक्यातील आहे. तर एटापल्ली तालुक्यातील तीन कामांसाठी त्यांनी निधी मंजूर केला आहे.
निधी खर्चात पालकमंत्र्यांची आघाडी
By admin | Updated: August 7, 2015 01:10 IST