गडचिराेली येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डाॅ. नामदेव उसेंडी हाेते. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल मल्लेलवार, सी.बी. आवळे, काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घाेटेकर, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, डी.डी. साेनटक्के, समशेर पठाण, वामन सावसागडे, एजाज शेख, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, बाशिद शेख, शंकर डाेंगरे, काशिनाथ भडके, महादेव भाेयर, राकेश रत्नावार, कल्पक मुप्पीडवार, अपर्णा खेवले, विद्या कांबळे उपस्थित हाेते.
प्रबुद्ध समाजमंडळ काॅम्प्लेक्स, गडचिराेली
काॅम्प्लेक्समधील आंबेडकर चाैकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नारायण लाेणारे हाेते. लाेणारे यांनी धार्मिक ध्वज फडकाविला. त्यानंतर रूपचंद उंदीरवाडे यांनी तथागत बुद्धांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला सुरेश भानारकर, सुनील बारसिंगे यांच्यासह समाजबांधव उपस्थित हाेते.
शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिराेली
येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य डाॅ. हेमलता चाैधरी, प्रा. अमर कुरील, डाॅ. मंदार पैगनकर उपस्थित हाेते. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. यशस्वितेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था कार्यालय, गडचिराेली
येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. ऑनलाइन कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर, प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर उपस्थित हाेते. बाबासाहेबांनी नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून जसे मूलभूत अधिकार दिले तसेच काही मूलभूत कर्तव्य सांगितले आहेत. यामध्ये वने, पर्यावरण व वन्यजीवांचे संरक्षण ही नागरिकांची जबाबदारी आहे. परंतु, याबाबत नागरिक जागरूक दिसत नाही, असे प्रतिपादन डाॅ. किशाेर मानकर यांनी केले. यावेळी गणवीर यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूरचे समतादूत सचिन फुलझेले, तर आभार गडचिराेलीच्या समतादूत वंदना धाेंगडे यांनी मानले.
केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामाेर्शी
येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. दिनेश सुरजे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रा. तुषार भांडारकर, छबील दूधबळे, श्रीकांत सरदारे, रूपेश चाैधरी, गुणेश चाचेरे, सहायक प्रा. शारदा दुर्गे, जयश्री कानकाटे उपस्थित हाेते. डाॅ. दिनेश सुरजे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन गुणेश चाचेरे यांनी केले.