शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

पडिक जमिनीवर बहरली हिरवी वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM

वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली.

ठळक मुद्देवन विभागाचे नियोजन : नैनपूर, शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव व एकलपुरातील झुडपी जंगल

पुरूषोत्तम भागडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यात वन विभागाची शेकडो हेक्टर वन जमीन ओसाड होती. या जागेवर अतिक्रमणधारकांची करडी नजर होती. मात्र वनविभागाने अशा पडिक जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यानुसार गत पाच ते सात वर्षापूर्वी या जागेवर वृक्षारोपण केल्याने सध्या पडिक जमिनीवर हिरवी वनराई बहरली आहे.देसाईगंज तालुक्यात नैनपूर शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव (हलबी) एकलपूर टोला परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली. अनेक वर्षांपासून काही लोकांनी अतिक्रमण केले असताना त्या लोकांना डावलून महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बनावट कागदेपत्रांच्या आधारे वनहक्क पट्टे प्राप्त केल्याची प्रकरणे आहेत. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. असे प्रकार तालुक्यात घडल्याने यापुढे झुडपी जंगलाच्या पडिक जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी वडसा वन विभागाने पुढाकार घेऊन शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्षारोपण केले होते. याची प्रचिती आता समोर आली असून पडिक जागेवर हिरवीगार वनराई डोलत आहे.हडपलेली जमीन परत घेण्याची गरजदेसाईगंज तालुक्यातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पडिक जमिनीवर वृक्ष लागवड केल्याने सध्या शेकडो हेक्टर जमिनीवर घनदाट जंगल आकार घेत आहे. उपलब्ध पाणीसाठा व गर्द हिवराईमुळे येथे प्राण्यांचाही वावर वाढला आहे. नैसर्गिक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यास हे जंगल उपयोगी येणार आहे. याची मौलिक मदत होणार आहे. पारंपारिकरित्या अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या लोकांना डावलल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशा बनावट दस्तावेज सादर करून वन विभागाची शेकडो एकर जागा हडपणाऱ्या तालुक्यातील अनेक अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. वन विभागाने अशाचप्रकारे जागा ताब्यात घेऊन या जागेवर वृक्ष लागवड करावी, अशी मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग