शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला पावली दिवाळी; दोन कोटींची केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:41 IST

महिलांची संख्या अधिक : गर्दीच्या हंगामाचा एसटीने उचलला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : इतरांसाठी रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणारा दिवाळी सण एसटीलाही नाराज करत नाही. त्यामुळे एसटी दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहत राहते. अर्धी तिकीट केल्यापासून तर महिला प्रवाशांचा एसटीकडे अधिकच ओढा वाढला आहे. १ ते १० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत गडचिरोली विभागाने सुमारे २ कोटी १३ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने बहुतांश बहिणी माहेरी जातात. या कालावधीत शाळांना सुट्या असल्याने मुलेही मामाच्या गावी फिरून येण्यास तयार होतात. याच कालावधीत धान कापणीचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे गावातील बहीण कामात व्यस्त असतात. तरीही वेळात वेळ काढून दिवाळीनंतर आठ दिवसांपैकी एक दिवस त्या हमखास भावाला ओवाळणी घालण्यासाठी माहेरी जातातच. राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात अर्धी तिकीट सुरू केल्यापासून एसटीत महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दिवाळीत तर या गर्दीने उच्चांक गाठला होता. बहुतांश बसेस फुल्ल भरून जात होत्या. या कालावधीत गडचिरोली विभागातील एसटीने सुमारे २ कोटी १३ लाख रुपये कमावले आहेत.

साडेसहा लाख किमी प्रवास 

  • १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत एसटी बसगाड्या सुमारे ६ लाख ४० हजार किमी धावल्या आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या बसेसही सोडण्यात आल्या होत्या. चंद्रपूर व नागपूर हे दोन मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. या कालावधीत शाळांना सुट्या असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी वापरता आल्या. त्याचा फायदा एसटीला झाला आहे. 
  • गडचिरोली विभागांतर्गत अहेरी, गडचिरोली व ब्रह्मपुरी या तीन विभागांचा समावेश होतो. या कालावधीत तीनही आगारांतील एसटी बसगाड्यांनी सुमारे ५ लाख ३२ हजार ५९२ प्रवाशांची वाहतूक केली.

"दिवाळी कालावधीत प्रवाशांची संख्या वाढली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीने नियोजन केले होते. ज्या मार्गावर प्रवासी अधिक आहेत. त्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या. एसटी कर्मचारी व अधिकारी यांनीही दिवाळीच्या कालावधीत मन लावून काम केले. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे." - अशोक वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली