शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी धोरणाचा तेंदूपत्ता व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:50 IST

सरकारकडून तंबाखूजन्य पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून हे पदार्थ महाग केले जात आहेत. याचा फटका बिडी व पर्यायाने तेंदूपत्ता व्यवसायाला बसत चालला असून याचा परिणाम यावर्षी दिसून आला आहे.

ठळक मुद्देबिडी पिणाऱ्यांची संख्या कमालीची घटली : तंबाखूवरील विविध करांमुळे किमतीत वाढ

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सरकारकडून तंबाखूजन्य पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून हे पदार्थ महाग केले जात आहेत. याचा फटका बिडी व पर्यायाने तेंदूपत्ता व्यवसायाला बसत चालला असून याचा परिणाम यावर्षी दिसून आला आहे.तेंदूपत्त्यापासून बिडी तयार केली जाते. बिडी तयार करण्यासाठी तंबाखूचा वापर केला जातो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे काही तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध घातले आहेत. तर काही पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून त्यांची किंमत वाढवून त्यांचे सेवन कमी होईल, असा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. बिडीसाठी वापरल्या जाणाºया तंबाखूही महाग करण्यात आला आहे. पर्यायाने बिडी महाग होऊन त्याचे सेवन दरवर्षी घटत चालले आहे. बिडीचा वापर प्रामुख्याने राजस्थान, बिहार, गुजरात आदी राज्यांमधील नागरिक करतात. मात्र शासनाच्या जनजागृतीनंतर बिडीचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी तेंदूपत्त्याची मागणी दरवर्षी घटत चालली असल्याचे दिसून येते. मागील वर्षी कंत्राटदारांनी चढत्या दराने तेंदूपत्ता खरेदी केला. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचा दर सुमारे २ हजार २०० रूपये प्रती शेकडापर्यंत पोहोचला होता. मात्र बाजारात उठाव नसल्याने तेंदूपत्त्याची विक्री झाली नाही. मागील वर्षीचाच काही तेंदूपत्ता शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदूपत्ता खरेदीकडे पाठ फिरविली. याचा परिणाम म्हणजे, काही ठिकाणचे तेंदूपत्त्याचे लिलाव झाले नाही. त्यामुळे तेथील व्यवसाय अडचणीत आला आहे. किमान मजुरी तरी मिळावी, या उद्देशाने मिळेल त्या किमतीला तेंदूपत्ता विकला जात आहे.बिडीला अनेक पर्यायी उत्पादने बाजारात उपलब्धदहा वर्षांपूर्वी बिडीला चिलम व हुक्का हे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यातही ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक बिडी व चिलमचाच वापर करीत होते. त्यातही बिडीची मागणी अधिक होती मात्र आता बिडी व चिलमला पर्याय म्हणून सिगारेटसारखे उत्पादने बाजारात आली आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेली सिगारेटसारखी उत्पादने तरूण पिढीला आकर्षीत करीत असल्याने तरूण पिढी बिडीच्या ऐवजी सिगारेटचा वापर अधिक करीत असल्याचे दिसून येते. बिडी पिणे हा कमीपणा वाटत असला तरी सिगारेट मात्र प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्याने बिडीचा वापर कमी झाला आहे.बिडीच्या किमतीतच स्वस्तात इतर उत्पादने मिळायला लागल्याने बिडीचा वापर कमी होत चालला आहे.तेंदूपत्त्याच्या बाजारात कमालीची मंदी आल्याने काही कंत्राटदारांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी २२ कंत्राटदारांनी तेंदूपत्ता लिलावात भाग घेतला होता. यावर्षी मात्र केवळ सातच तेंदूपत्ता कंत्राटदार शिल्लक राहिले. त्यातही जिल्ह्यातील दोन व दुसºया जिल्ह्यातील पाच कंत्राटदारांचा समावेश आहे.