अहेरी : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत असलेले सतीश वासुदेव मरस्कोले यांनी घराच्या परिसरातील विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ मे रोजी रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शेजारच्या नागरिकांनी या घटनेसंदर्भाची माहिती तत्काळ पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सतिश मरस्कोले यांना विहिरीतून बाहेर काढले. सदर विहीर ३० फूट खोल असल्याने सतीश मरस्कोले यांना हाता, पायाला व चेहऱ्याला दुखापत झाली. सदर प्रतिनिधींनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासापायी आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे मरस्कोले यांनी सांगितले. मरस्कोले यांना अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ताकिद देण्यात आली होती. शिस्तभंग कारवाईच्या प्रस्तावात मरस्कोले यांचे नाव असल्याने आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
शासकीय कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: May 6, 2015 01:39 IST