आरमोरी/वैरागड : देशातील व राज्यातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.भारतीय जनता पार्टीच्यावतीने सभासद नोंदणी अभियान सुरू केला असून या नोंदणीचा आढावा घेण्यासाठी ते आरमोरी व वैरागड येथे आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. आरमोरी येथील राजीव भवन सभागृहात तालुका भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा संघटनमंत्री आशिष वांदिले, उमाकांत ढेंगे, प्रदेश सदस्य नाना नाकाडे, भाजपा तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, रवींद्र बावनथडे, राजू जेठाणी, राम पडोळे, ईश्वर पासेवार, पंकज खरवडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन सुनिल नंदनवार यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रदीप हजारे, संतोष गोंधोळे, देवानंद बोरकर, धनंजय बांबोळे, राजू जराते, प्रमोद पेंदाम, सावजी दुमाने, संजय खरकाटे, केशव कार यांनी सहकार्य केले.वैरागड येथील कार्यक्रमादरम्यान भाजप तालुका दलित आघाडीच्या वतीने ना. बडोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, राजू जेठाणी, नाना नाकाडे, पंकज खरवडे, राम पडोळे, रवींद्र बावनथडे, प्रदीप हजारे, देवानंद बोरकर, कासावार, धनंजय बांबोळे उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
समान न्यायासाठी शासन कटिबद्ध
By admin | Updated: January 28, 2015 23:34 IST